नेरूळ : राज्याच्या सर्वात जास्तवेळा उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवारांनी रेकार्ड मोडला. परंतु अजित पवारांना अद्यापही मुख्यमंत्री होता आले नाही. याची खंत अनेकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखवली आहे. तसेच अनेक वेळा भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे पोस्टर झळकवण्यात आलेत. यातच आता एका युवकाने अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पदयात्रा काढली आहे.
हेही वाचा…“भाजपने अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, होय मी मनोरूग्ण,” राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे यासाठी सागर पवार या युवकाने नेरूळ ते तुळजापूर असा पायी प्रवास सुरू केला आहे. नेरूळ ते तुळजापुर पदयात्रेचा आजचा सातवा दिवस असून १८५ किलीमीटरचे अंतर पायी चालून पाटसपर्यंत पोहचली आहे. त्यानंतर तुळजा भवानीकडे अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घालणार आहे.
हेही वाचा…सन्मान कार्याचा, गौरव व्यक्तींचा,’ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे पुरस्कार जाहीर
दरम्यान, आजपासून सुरू झालेली ही यात्रा तब्बल १२ दिवस चालणार असून त्यानंतर तुळजापुर याठिकाणी पोहचणार आहे. सदर पदयात्रेत १२ ते १५ जण सामील झाले असून यावेळी तुळजा भवानीला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घालणार आहे. यातच अधिक माहिती देताना अजित पवार कसे मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार आहेत हे सांगितले तसेच गावोगावी या पदयात्रेचे स्वागत होणार अशी आशा सागर पवार यांनी व्यक्त केली असून या पदयात्रेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कार्तिकी एकादशीच्या पुजेला मराठा समाजाचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ मोठं आवाहन
हेही वाचा…“फडणवीस अन् सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी,” एकच खळबळ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहात एकच खळबळ
हेही वाचा…“होय, माझ्या मागे मोठी शक्ती आहे”, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणती शक्ती ?
हेही वाचा…नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, कोर्टाने बजावले समन्स, संजय राऊतांची मोठी खेळी