पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटिलला ससूनमधून पळून जाण्यासाठी पोलिसांकडून मदत केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटील पळून गेल्याची माहिती तीन तासांनी कंट्रोल रूमला प्राप्त झाली. पोलीस नाईक नाथा काळे, अमित जाधव यांच्याकडून ललित पाटील याला मदत झाल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धाकेदोरे अजून कुठपर्यंत जाणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस पक्षाचं बळ वाढलं, ‘या’ दोन बड्या पक्षांनी काॅंग्रेसला जाहीर केला पाठिंबा
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात काही राजकीय नेत्यांच्या हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर ललित पाटील प्रकरणाबाबत सातत्याने पाठपुरावा करतांना दिसत आहे. तर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. या आधी या प्रकरणात मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन यासह राज्याचे गृहमंंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
हेही वाचा…जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार दगडफेक
दरम्यान, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आता पर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणाच्या संबंधित अनेकांना निलंबित करण्यात आलंय. यातच आता ससूनमधून पळून जाण्यास चक्क पोलिसांनी मदत केल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री, ‘या’ माजी मंत्र्यांचा करणार प्रचार
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळवा”, एकनाथ खडसेंनी कोणती केली मागणी ?
हेही वाचा…अखेर मराठा आंदोलकांनी नमतं घेतलं, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कुणाला ?
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा प्रशासनाला अल्टिमेटम, मराठा आंदोलक अन् प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न
हेही वाचा…मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल