बुलढाणा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढील सर्व निवडणुका ह्या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा रंगण्याची शक्यता आहे. यातच आता मनसेनेही लोकसभा निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली असून शेगाव येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
हेही वाचा…“एक फुल अन् दोन हाफ सरकारमुळे राज्याचं मोठं नुकसान,” वडेट्टीवारांचा जोरदार हल्लाबोल
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा निर्धार मनसेने केला आहे. उमेदवार रेल्वे इंजिन असे यावेळी सांगण्यात आले असून नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. संत नगरीतील हॉटेल साई गजाननमध्ये मंगळवारी दुपारी १ वाजता सुरू झालेली ही बैठक संध्याकाळी उशिरा पार पडली. आमदार जयप्रकाश बाविस्कर, राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा…“तर तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो”, जरांगे पाटलांचं अजित पवारांना खास आवाहन
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मदन गायकवाड, शेतकरी सेनेचे प्रदीप भवर शैलेश गोंधने, मनविसेचे शैलेंद्र कापसे, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, शहराध्यक्ष अमित देशमुख, यांच्यासह तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संचलन विनोद टिकार तर रवींद्र उन्हाळे यांनी आभार मानले.
READ ALSO :
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल, युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“तुम्हीच सांगा..,तर काय करायला हवं ?” ऐकलं नाही तर मनसे खळखट्याक करण्याच्या तयारीत
हेही वाचा…“२५ लाख बेरोजगारांचा प्रश्न, परिक्षांचा निकाल कधी ?” विरोधी पक्षांचा सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…शरद पवार गटातील खासदारांची उपराष्ट्रपतींशी भेट अन् इकडे प्रफुल पटेलांच्या मनात धडकी भरली
हेही वाचा…“..म्हणून मी संत तुकाराम महाराजांबद्दल तसं बोललो,” बागेश्वर बाबांचा पुन्हा माफिनामा