मुंबई : महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या लावण्याची मुदत संपत आहे. त्यावरून आता मनसेने मुंबईतील व्यापाऱ्यांना दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची आठवण करून दिली आहे. यावरून फक्त तीन दिवस बाकी असल्याचं म्हणत व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी उभी केली महिलांची मोठी फौज, राष्ट्रवादीत अनेक महिलांना लागली लॉटरी
मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात, यासाठी मनसेने जोरदार आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती. ती मुदत आता संपत आल्याची आठवण मनसेकडून करून देण्यात आलीय.
हेही वाचा…“चुकीला माफी नाही”, बागेश्वर बाबा संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत दाखल
दरम्यान, मनसेने याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात असं म्हटलंय की, आमच्या ‘मराठी पाट्यांच्या’ आंदोलनांमुळे बरेच जण वठणीवर आले पण काही जण ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचाही आदेश जुमानत नसतील तर काय करायला हवं ? तुम्हीच सांगा. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायला आता शेवटचे ३ दिवस बाकी आहेत.
आमच्या ‘मराठी पाट्यांच्या’ आंदोलनांमुळे बरेच जण वठणीवर आले पण काही जण ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचाही आदेश जुमानत नसतील तर काय करायला हवं ? तुम्हीच सांगा. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करायला आता शेवटचे ३ दिवस बाकी आहेत. #मनसेदणका pic.twitter.com/BqxQ7hU4uL
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“२५ लाख बेरोजगारांचा प्रश्न, परिक्षांचा निकाल कधी ?” विरोधी पक्षांचा सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…शरद पवार गटातील खासदारांची उपराष्ट्रपतींशी भेट अन् इकडे प्रफुल पटेलांच्या मनात धडकी भरली
हेही वाचा…“..म्हणून मी संत तुकाराम महाराजांबद्दल तसं बोललो,” बागेश्वर बाबांचा पुन्हा माफिनामा
हेही वाचा…“एक फुल अन् दोन हाफ सरकारमुळे राज्याचं मोठं नुकसान,” वडेट्टीवारांचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“तर तुमच्या सत्कारासाठी ट्रकभर गुलाल आणि फुलं आणतो”, जरांगे पाटलांचं अजित पवारांना खास आवाहन