पुणे : भाजपचे माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी बागेश्वर बाबा यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. त्यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावरून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…“तुम्हीच सांगा..,तर काय करायला हवं ?” ऐकलं नाही तर मनसे खळखट्याक करण्याच्या तयारीत
आजकाल आपण मानतो त्यांच्यातही वाद आहेत. नेत्यांमध्ये, समाजात, कार्यकर्त्यांमध्ये वाद चालू आहे. हा महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलं आहे. महाराष्ट्रानं देशाला, जगाला विचार दिले. पण साईबाबांच्या भूमीत त्यांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर महाराजांप्रती देवेंद्र फडणवीसांच्या आस्था अधिक असू शकतात. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असल्याचं बचू कडू यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“२५ लाख बेरोजगारांचा प्रश्न, परिक्षांचा निकाल कधी ?” विरोधी पक्षांचा सरकारवर जोरदार घणाघात
दरम्यान, बागेश्वर बाबा यांना देखील युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. पुण्यातील संचेती येथे युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. यातच बागेश्वर बाबांचा कार्यक्रम झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीनिमित्ताने विठ्ठलाची पुजा करण्यासाठी पंढरपुरला रवाना होणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
हेही वाचा…“..त्यामुळे त्याचं मला खूप दु:ख झालं,” ‘त्या’ फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…उमेदवार ‘रेल्वे इंजिन’चाच असणार, बुलढाणा लोकसभा निवडणुकबाबत मनसेचं ठरलं
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल, युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात