मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिण प्रभाग अंतर्गत ना.म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परळ येथील डिलाईल पुलाच्या रस्त्यांचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचे भूमिपूजन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या पुलाचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी आधीच केल्याने मोठी वाद निर्माण झाला होता.
हेही वाचा…उमेदवार ‘रेल्वे इंजिन’चाच असणार, बुलढाणा लोकसभा निवडणुकबाबत मनसेचं ठरलं
मुंबईतील लोअर परळ पुलाच्या उद्घाटनावरून ठाकरे गट आणि महापालिकामध्ये मोठा वाद झाला होता. आदित्य ठाकरे यांनी पुलाचं उद्घाटन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून मोठा वाद सुरू झाला. यातच आता पुन्हा दिपक केसरकर यांच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होत आहे. मात्र यावेळी आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय. परंतु आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असल्याने कार्यक्रमाला येणार की नाही याबाबत सशंका आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल, युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
दरम्यान, या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, आमदार आशीष शेलार यांच्यासह आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह यांनाही सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. त्यासोबतच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे असतील. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, पूल विभागाचे प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर आदी मान्यवरांचीही उपस्थिती असेल.
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम
हेही वाचा…“महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलंय”
हेही वाचा…मोठी बातमी..! बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
हेही वाचा…“..त्यामुळे त्याचं मला खूप दु:ख झालं,” ‘त्या’ फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल