नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या ७ डिसेंबर पासून नागपुरात सुरुवात होणार आहे. राज्यात मागील काही महिन्यांपासून आरक्षणावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे आता सगळ्यांचच लक्ष लागून राहिलंय. यातच आता हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात मंत्र्यांसाठी बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. राज्य सरकारमध्ये सध्या २८ कँबिनेट मंत्री असून राज्यमंत्रीपद अद्यापही देण्यात आलं नाही.
हेही वाचा…मोठी बातमी..! बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
नागपूरात हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांना रवी भवन परिसरातील 1 नंबरचा बंगला देण्यात आला आहे. छगन भुजबळ यांचे या बंगल्यात वास्तव्य असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. दोन नंबरचा बंगला हा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आला आहे. तीन नंबरचा बंगला महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांना देण्यात आला आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे त्याचं मला खूप दु:ख झालं,” ‘त्या’ फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्री छगन भुजबळ यांनी अलिकडेच कुणबी प्रमाणपत्रावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. यातच मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक झाली आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांकडून छगन भुजबळ यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. यातच आता हिवाळी अधिवेशनात देखील छगन भुजबळ यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाऊ शकते.
हेही वाचा…महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल
दरम्यान, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून ओबीसी विरूद्ध मराठा समाज असा संघर्ष बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे आदिवासींमधून आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. यातच आदिवासी आणि धनगर समाजाचे अनेक मोर्चे निघाले आहेत. यातच आता हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे. यावरून नागपुरात असंख्य मोर्चे देखील धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांसोबत विठ्ठलाची पुजा करण्याचा मान नाशिकच्या ‘या’ दाम्पत्याला, फडणवीसांकडून विठ्ठलाच्या मंदिरासाठी निधीचा पाऊस
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांकडून पंढरीत विठूनामाचा गजर, टाळ मृदूंग वाजवत फुगडीही खेळली
हेही वाचा…“आधी गुन्हा अन् आता निमंत्रण,” लोअर परळ पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंना निमंत्रण
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम
हेही वाचा…“महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलंय”