कोल्हापूर : ऊस दरावरून मागील काही दिवसापासून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. ऊस दरावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी बुधवारी मुंबईत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकही तोडग्याविना निष्फळ ठरली आहे. मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला ४०० ऐवजी १०० रूपये मिळालेच पाहिजेत, यावर स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने आता त्यांनी पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय.
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, भुजबळांच्या बंगल्याची सुरक्षा टाईट
उसाच्या गेल्या वर्षीच्या दरात १०० रूपये वाढीव देण्यात यावे, यासाठी राजु शेट्टी यांनी महामार्गावर आंदोलन सुरू केलं आहे. यातच कारखानदारांनी यावर्षीपासून १०० रूपये वाढीव देण्याची अट घातली आहे. परंतु आम्हाला आता हीच अट मान्य नाही आहे.पुढच्या वर्षापासून १०० रूपये देऊन त्याचा उपयोग काय ? असा सवाल करीत मागच्या वर्षाचे पैसे आहेत. त्यांनी ते अगोदर पैसे द्यावेत. तरच निर्माण झालेली कोंडी फुटेल. असाही इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…फडणवीसांसोबत विठ्ठलाची पुजा करण्याचा मान नाशिकच्या ‘या’ दाम्पत्याला, फडणवीसांकडून विठ्ठलाच्या मंदिरासाठी निधीचा पाऊस
दरम्यान, मागील वर्षाचाच दिला पाहिजे, कारण गेल्या वर्षात पिकलेल्या उसाच्या उत्पादनातून तयार झालेल्या साखरेतून पैसे जास्त मिळाले आहेत. जर यावर्षीच्या उसाला पैसे दिलेत. तर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी ज्या शेतकऱ्यांकडे उस नाही. त्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल.असे छोटे शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. यातच कारखानदारांवर सन मुश्रीफ आणि सतेज पाटील दबाव टाकत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. यातच मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”, कुणी केली भविष्यवाणी ?
हेही वाचा…प्रिय देवेंद्रजी..,’पनवती’ हा शब्द भाजपवाल्यांना इतका का झोंबला? कुणी डिवचलं?
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंना उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार? नवा आणि आश्वासक चेहऱ्याचा शोध, आज बैठक
हेही वाचा…शरद पवार गटातील ४ खासदारांना निलंबित करा, परंतु अजित पवार गटाने ‘या’ 3 खासदारांना वगळलं, एकच चर्चा
हेही वाचा…सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, थेट शरीरातील अवयवांचे पाठवले रेट कार्ड, किडनी ७५,००० तर लिव्हर ९०,०००…