पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. यातच आज उद्धव ठाकरे यांनी रायगड लोकसभा, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली आहेय. खोपोली येथील वृद्धाश्रमा जवळ ही बैठक होती, यात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यातच आता माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे.
हेही वाचा…प्रिय देवेंद्रजी..,’पनवती’ हा शब्द भाजपवाल्यांना इतका का झोंबला? कुणी डिवचलं?
रायगड लोकसभेतून मला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मी रायगड लोकसभा लढवणार आहे. खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रमाजवळ ही बैठक आहे. बैठकीला पक्षाचे नेते, उपनेते, आमदार मुंबई विभागप्रमुख, रायगडचे जिल्हाप्रमुख, उपस्थित राहणार आहेत. यावेळी इतर विषयांवरही चर्चा होणार असल्याचं अनंत गिते यांनी म्हटलंय. तसेच मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव शिवसेना उद्ध बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंना उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार? नवा आणि आश्वासक चेहऱ्याचा शोध, आज बैठक
सध्या रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे खासदार आहेत. तटकरे यांनी २०१९ मध्ये तत्कालीन खासदार अनंत गीते यांचा पराभव केला होता. यातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाच्या बाजूकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. त्यामुळे आता दोन्ही गटातील नाराज कार्यकर्त्यांचा फायदा हा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता गितेंनी व्यक्त केली आहे. तसेच आता २०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अनंत गिते तयार झाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…शिरूरचं राजकारण तापलं..! आढळराव पाटील अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनंतर अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला
हेही वाचा…“भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं”,जरांगे पाटलांनी भुजबळांना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…“…तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल”, कोणी केली मोठी घोषणा ? राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…सतेज पाटील, मुश्रीफांकडून कारखानदारांवर दबाव, ऊस दरवाढीवरून राजु शेट्टींनी घेतला आंदोलनाचा पवित्रा
हेही वाचा…“३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”, कुणी केली भविष्यवाणी ?