मुंबई : आरक्षणाबाबत पक्षाला माझी भूमिका अयोग्य वाटल्यास राजीनामा देण्यास तयार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्यावरून मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील विरूद्ध छगन भुजबळ असा राजकीय सामाना बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अलिकडेच अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणतीही भूमिका न घेण्यास सांगितले आहे. त्यावरून आता छगन भुजबळ यांनी थेट राजीनामा देणार असल्याचा संकेत दिलं आहे.
हेही वाचा…सकाळी अपात्र खासदारांच्या यादीतून नाव वगळलं, दुपारी अजित पवारांची भेट, अमोल कोल्हे म्हणाले..,
अजित पवार आमच्या पक्षातील सर्वोच्च नेते आहेत. पक्षानं सांगितल्यास राजीनामा देणार. मी ओबीसींसाठी काम करतो आणि ते मी थांबवणार नाही. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे याबाबत स्पष्टता असु द्या. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटण्याची माझी तयारी आहे. राज्यात इतर सभेसाठी रात्री १० वाजेपर्यंत बंधनं घालण्यात आली आहेत. मग मनाज जरांगे पाटलांच्या सभा रात्री १२ वाजेपर्यंत कशा चालतात? असा सवालही भुजबळांनी केला आहे.
हेही वाचा…२०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार तयार, माजी केंद्रीय मंत्र्यांला लोकसभेची उमेदवारी जाहीर ?
सर्वपक्षीय बैठकीत बीड जाळपोळीच्या घटनांवरील माझ्या प्रश्नावर इतर नेते गप्प होते. इतरांना न दुखावता प्रत्येकांन आपआपली बाजू मांडावी असं अजित पवार म्हणाले. जरांगे पाटील मराठा समाज तर मी ओबीसी समाजाची भूमिका मांडत असल्याचं अजितदादांना सांगितले. तसेच आजही माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मला किंवा माझ्या समाजाला टार्गेट केल्यावरच मी बोलेन. असंही छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…शिरूरचं राजकारण तापलं..! आढळराव पाटील अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनंतर अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला
दरम्यान, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी पहिल्यापासून आम्ही भूमिका मांडत आहोत. ही भूमिका छगन भुजबळ मांडत असतील तर त्यात वावगं काहीच नाही. कारण तीच सर्वपक्षीय सरकारची भूमिका असून व्यासपीठावरून त्यांनी मांडली आहे. तसेच छगन भुजबळ यांना राजीनामा देण्याची कोणतीही गरज नाही, असं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महायुती सरकारने जनतेला बनवले मुर्ख,” लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आदेशास सरकारकडून स्थगिती
हेही वाचा…राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस, नक्की कारण काय?
हेही वाचा…ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र