पुणे : आगामी लोकसभांच्या दृष्टीकोनातून मनसेने आता लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून आढावा बैठका देखील घेतल्या जात आहेत. यातच पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक वसंत मोरे यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात ठिकठिकाणी वसंत मोरे यांचे पोस्टर देखील झळकवले आहेत.
हेही वाचा…नाशकात अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टॉमॅटोचा वर्षाव, शेतकरी आक्रमक, ताफा अडविण्याचा प्रयत्न
पुणे लोकसभेची जबाबदारी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर देण्यात आली आहे. अलिकडेच अमित ठाकरे यांनी पुणे दौरा केला असून वसंत मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला. यातच सध्या वसंत मोरे यांच्याकडे बारामती विधानसभेसाठी समन्वयक पदाचीही जबाबदारी दिली आहे. यातच आता पुण्यात ठिकठिकाणी वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत. या पोस्टरवर वसंत मोरे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख केल्याने लोकसभा निवडणुक आधीच वसंत मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी बार उडवून दिला आहे.
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ चार शिलेदारांकडे पुण्याची जबाबदारी, संपूर्ण शहर पिंजून काढणार
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत येण्याची शक्यता आहे. महायुतीकडून पुणे लोकसभेची जागा भाजपला मिळण्याची शक्यता असून महाविकास आघाडी काॅंग्रेसला जागा सोडण्याची शक्यता आहे. यातच मनसेने उडी घेतल्याने पुणे लोकसभा तिरंगी झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. वसंत मोरेंना मनसेचे फायर ब्रॅंडनेते म्हणून ओळखले जाते. मोरे मनसेचे माजी नगरसेवक असून आपल्या प्रभागात अनेक चांगली कामे केली आहेत. तसेच ते मनसेचे पुणे शहराचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे पुणे करांचं मोठं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पक्ष फुटीचा राज्यात ‘कुणाला’ फायदा ? लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेत मोठी माहिती समोर
हेही वाचा…भाजप-शिंदे- अजित पवारांविरोधात ठाकरे मावळमध्ये लढणार, भाजपचा ‘हा’ जुना गडी ठाकरे मैदानात उतरवणार
हेही वाचा…राज ठाकरेंनी लोकसभेसाठी निवडले ‘९’ तगडे उमेदवार, भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेसवरही भारी पडणार ?
हेही वाचा…“चुकीबद्दल एक भाऊ म्हणून माफी मागतो”, आधी टिका नंतर माफी, सुप्रिया सुळेंवरील ‘ती’ टिका मिटकरींना भोवली
हेही वाचा…बावनकुळेंसोबत वाद, अन् आता फडणवीसांकडून बच्चू कडूंचं कौतूक, नेमकं शिजतंय तरी काय ?