पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे देखील कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या वतीने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि विभागप्रमुख संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्याची आली. यातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेच्या संभाव्य यादी समोर आली आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या ९ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, त्याआधी मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे ९ लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून अभिजित पानसे आणि अविनाथ जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“लोकभावनेची झुळूक जर आली तर..,” शरद पवारांच्या ‘या’ पट्टशिष्यांनी अजित पवार गटाला दिला धोक्याचा इशारा
दुसरीकडे पुणे लोकसभेसाठी माजी नगरसेवक वसंत मोरे यांचं नाव समोर आलं आहे. तर उत्तर पश्चिम मंबई लोकसभेसाठी शालिनी ठाकरे, दक्षिण मुंबई लोकसभआ बाळा नांदगावकर, संभाजीनगर लोकसभेतून प्रकाश महाजन, सोलापूर लोकसभेसाठी दिलीप धोत्रे तर चंद्रपूर लोकसभेसाठी राजू उंबरकर आणि रायगड लोकसभा निवडणुकीसाठी वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
मनसेची लोकसभेसाठी संभाव्य यादी
कल्याण लोकसभा – श्री राजू पाटील
ठाणे लोकसभा – श्री अभिजित पानसे/ श्री अविनाश जाधव
पुणे लोकसभा – श्री वसंतराव मोरे
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- सौ.शालिनीताई ठाकरे
दक्षिण मुंबई लोकसभा- श्री बाळा नांदगावकर
संभाजी नगर लोकसभा – प्रकाश महाजन
सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे
चंद्रपूर लोकसभा – श्री राजू उंबरकर
रायगड लोकसभा – वैभव खेडेकर
READ ALSO :
हेही वाचा…“चुकीबद्दल एक भाऊ म्हणून माफी मागतो”, आधी टिका नंतर माफी, सुप्रिया सुळेंवरील ‘ती’ टिका मिटकरींना भोवली
हेही वाचा…बावनकुळेंसोबत वाद, अन् आता फडणवीसांकडून बच्चू कडूंचं कौतूक, नेमकं शिजतंय तरी काय ?
हेही वाचा…नाशकात अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टॉमॅटोचा वर्षाव, शेतकरी आक्रमक, ताफा अडविण्याचा प्रयत्न
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ चार शिलेदारांकडे पुण्याची जबाबदारी, संपूर्ण शहर पिंजून काढणार
हेही वाचा…“काॅंग्रेसला एकही मत मिळणार नसणाऱ्या बुथ अध्यक्षाला ५१,०० रूपयांचे बक्षीस देऊ”, ‘या’ भाजप नेत्याची घोषणा