मुंबई : राष्ट्रवादी चिन्हाबाबत आता निवडणुक आयोगात लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत काल निवडणुक आयोगात सुनावणी झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यातच शरद पवार आपल्याच पक्षात मनमानी कारभार करत होते. असा गंभीर आरोप देखील अजित पवार गटाने केला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवार गटाला एकप्रकारे इशाराच दिला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद, थेट शरद पवारांवर केले गंभीर आरोप
शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला. यासह राष्ट्रवादीबाबत अनेक दावे अजित पवार गटाकडून करण्यात आले. त्यावर काही पणत्यांनी एकत्र येऊन सुर्याला आव्हान दिलं आहे. दिव्यातलं तेल कधीतरी संपेल, लोकभावनेची झुळूक जरी आली तरी पणत्या क्षणात विझतील. सुर्याचं तेज मात्र स्वयंभू आहे. अखंड अथक आणि अविरत आहे. असं सुचक ट्विट प्रशांत जगताप यांनी केलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात घमासान, अजित पवार गटाने आणले गाडीभर पुरावे
दरम्यान, शिवसेनाप्रकरणाप्रमाणेच राष्ट्रवादीच्या प्रकरणात देखील निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार असल्याची चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीच्या प्रकरणात निवडणूक आयोग राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह गोठवले जाणार नाही. निवडणुक आयोग तात्पुरता निर्णय न देता अंतिमच निर्णय देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेप्रमाणे या ठिकाणी आधी तात्पुरता आणि मग अंतिम निर्णय असं होणार नाही. त्यामुळे एका गटाला घड्याळ चिन्ह आणि नाव मिळणार तर दुसऱ्या गटाला पक्षासाठी नवीन चिन्ह आणि नवीन नाव शोधावं लागणार आहे.
काही पणत्यांनी एकत्र येऊन सूर्याला आव्हान दिलं आहे. दिव्यातलं तेल कधीतरी संपेल, लोकभावनेची झुळूक जरी आली तरी पणत्या क्षणात विझतील.
सूर्याचं तेज मात्र स्वयंभू आहे.
अखंड, अथक आणि अविरत ! pic.twitter.com/2LxQWYG7fF— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) October 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजिदादा पुण्याचे पालकमंत्री होताच भाजप अन् शिंदेंच्या नेत्यांमध्ये धास्ती, डीपीसीमधून ‘या’ नेत्यांची होणार गच्छंती
हेही वाचा…“बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा…!”मनसेच्या महिला नेत्याचं आवाहन सुषमा अंधारेंनी स्विकारलं
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या एका गटाला फायदा तर दुसऱ्या गटाला फटका, निवडणुक आयोग ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत
हेही वाचा…“तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार बेकायदेशीर ठरतील,” जयंत पाटलांनी मांडलं गणित
हेही वाचा…“अजित दादा तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं?” बारामतीकरांचा अजितदादांना सवाल