मुंबई : राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची काल सुनावली निवडणुक आयोगात संपली आहे. आता यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तर निवडणुक आयोगाने पुढची सुनावणी ९ ऑक्टोंबरला संध्याकाळी चार वाजता होणार असल्याचं स्पष्ट केले. काल अजित पवार गटातील वकिलांनी युक्तिवाद केला. सोमवारी देखील त्यांच्याच गटाचा युक्तिवादासाठी वेळ देण्यात आला असून वेळ उरल्यास शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. यातच निवडणुक आयोगाकडून दोन्ही गटाला चिन्हाबाबत मोठा दिलासा मिळणार असून यामध्ये एका गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळाबाबत सुनावणी सुरू,आयोगात ‘हे’ बडे वकिल युक्तिवाद करणार
शिवसेनाप्रकरणाप्रमाणेच राष्ट्रवादीच्या प्रकरणात देखील निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार असल्याची चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीच्या प्रकरणात निवडणूक आयोग राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह गोठवले जाणार नाही. निवडणुक आयोग तात्पुरता निर्णय न देता अंतिमच निर्णय देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेप्रमाणे या ठिकाणी आधी तात्पुरता आणि मग अंतिम निर्णय असं होणार नाही. त्यामुळे एका गटाला घड्याळ चिन्ह आणि नाव मिळणार तर दुसऱ्या गटाला पक्षासाठी नवीन चिन्ह आणि नवीन नाव शोधावं लागणार आहे.
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निकालाआधीच शरद पवार गटाची मोठी खेळी, दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या
दरम्यान, निवडणुक आयोगात काल शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी तर अजित पवार गटाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. काल झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत राष्ट्रवादीच्या लढाईची सुरूवात करून दिली आहे. आता शिवसेनेप्रमाणेच पुढील काही दिवस राष्ट्रवादीच्या प्रकरणाबाबत सुनावणी होणार असून आता निकालाकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार बेकायदेशीर ठरतील,” जयंत पाटलांनी मांडलं गणित
हेही वाचा…“अजित दादा तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं?” बारामतीकरांचा अजितदादांना सवाल
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद, थेट शरद पवारांवर केले गंभीर आरोप
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात घमासान, अजित पवार गटाने आणले गाडीभर पुरावे
हेही वाचा…“जयंत पाटलांची नियुक्ती बेकादेशीर,” निवडणुक आयोगात अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद