नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि पक्षनावबाबत आज निवडणुक आयोगात सुनावणी होत आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून कागदपत्रे सादर केली जात असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित राहिले आहेत. यातच दोन्ही गटांना चार ते पाच तास युक्तिवाद करण्याचा वेळ दिला जाणार असून सुनावणी अंती घड्याळ आणि पक्षनाव कुणाला देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…शिंदे अन् अजित पवार गटातले नेते भिडले, अन् अधिकाऱ्यांनी एका वाक्यात विषय संपवला
राष्ट्रवादीच्या सुनावणीवेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावेळी देखील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली होती. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून महेश जेठमलानी बाजू मांडत असून त्यांनी एकनाथ शिंदेंच्याही बाजूने निवडणुक आयोगात बाजू मांडली होती. त्यामुळे आता शरद पवार, उद्धव ठाकरे एका बाजूला दुसऱ्या बाजूला अजित पवार, एकनाथ शिंदे असा सामना रंगला आहे.
हेही वाचा…“संकट आल्यावर एक फुल दोन हाफ कुठे गेले ?” उद्धव ठाकरे राज्य सरकारवर संतापले
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बंडखोर ४० आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये अजित पवारांसह गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात या आमदारांच्या अडचणीत वाढ होणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निकालाआधीच शरद पवार गटाची मोठी खेळी, दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…शिंदे ठाकरेंच्या विरोधात आक्रमक, मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी मातोश्रीपर्यंत जाण्याचे संकेत
हेही वाचा…पाय मुरगळला, इंजेक्शन दिलं अन् रूग्ण दगावला, सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार थांबता थांबेना
हेही वाचा…अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं, पण ठाकरेंवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले अन्..,” ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल