मुंबई : नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात्याला शिवसेना शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील यांनी टॉयलेट साफ करायला लावले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर हेमंत पाटील यांच्यावर अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु डीनवर त्यानंतर सदोष मनुष्यवधाचा आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…वडिलांवरील टिका श्रीकांत शिंदेंच्या जिव्हारी लागली, अन् आजी माझी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये वाकृयुद्ध रंगलं
एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले. ते डीन आदिवासी आहेत असं ते म्हणतात. मी कधीच जातपात पाहिली नाही. मी सर्वांना एकाच न्यायाने वागवलं आहे. मात्र, डीनला संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून डीनला धमकावण्यासाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का ? असा सवाल ठाकरेंनी केलाय.
हेही वाचा…“हजारे-आव्हाड वाद टोकाला,” अण्णा हजारे आव्हाडांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
दरम्यान, रूग्णालयात जे बळी गेले आहेत, त्यासाठी मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे की त्याठिकाणी जाऊन पाहणी करावी, परंतु मुख्यमंत्री सध्या दिल्लीत बसले आहेत. असं म्हणत असतांना नांदेडच्या डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला ? फक्त मिंधे सरकारमधील एका खासदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर डीनवर गुन्हा दाखल झाला. मग इतर शासकीय रूग्णालयात मृत्यू झालेत तिथल्या डीनवर का गुन्हा दाखल केले नाहीत. ? असा सवालही ठाकरेंनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे अन् अजित पवार गटातले नेते भिडले, अन् अधिकाऱ्यांनी एका वाक्यात विषय संपवला
हेही वाचा…“संकट आल्यावर एक फुल दोन हाफ कुठे गेले ?” उद्धव ठाकरे राज्य सरकारवर संतापले
हेही वाचा…ठाकरेंची ‘ती’ चूक शरद पवार टाळणार, अन् निवडणुक आयोगाचा निकाल जिंकणार ? वाचा सविस्तर
हेही वाचा…बारामती अॅग्रोबाबत रोहित पवारांना हायकोर्टाचा पुन्हा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“तर तुमच्या कानाजवळ डी.जे वाजवल्याशिवाय राहणार नाही,” सुषमा अंधारेंना ‘कोणी’ दिला इशारा