मुंबई : तुमचं वय किती, बोलता किती, मुख्यमंत्र्यांची जेवढी कारकीर्द आहे, तेवढं तुमचं वय सुद्धा नाही. तुम्हाला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सर्व फुकट मिळालं आहे. दोन आमदारांचा बळी घेतला. त्यानंतर आमदार आणि मंत्री सुद्धा झालात. पक्ष वाढीसाठी काय करावं लागतं, तुम्हाला काय कळणार? असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना सुनावले. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी,” ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा सामंतांनी मांडला हिशोब
मागील काही दिवसापासून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टिका करीत आहे. यातच मुख्यमंत्र्यांना चर्चा करण्याचं आवाहन दिलं होतं, परंतु ते दिल्ली पळवून गेले, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. ठाकरेंची टिका श्रीकांत शिंदेंच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. स्वत; ची काळजी घ्या, मी फक्त सल्ले देणार हे मुख्यमंत्र्यांचं काम नहाी. जमिनीवर उतरून लोकांचे अश्रू पुसण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे, ते काम एकनाथ शिंदे करत असल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं.
हेही वाचा…निवडणुक आली की गाजर दाखविण्याचं काम, मोदींजी देशातील जनता तुम्हाला विटलीय
दरम्यान, कुणीतरी आपल्या लायकीप्रमाणे बोललल्याचं समोर आलं. त्यांचा विचार कुठपर्यंत जातो हे पाहिलं. कुणीतरी बालबुद्धी म्हणून संबोधलं होतं. माझ्या मुलालाही जास्त समजतं. विचारांची दिवाळखोरी महाराष्ट्रानं पाहिली आहे. मुख्यमंत्री घाबरून गेले म्हणणे हे हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री गृहमंत्रालयाकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीला गेले आहेत. असा पलटवार श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर केला.
READ ALSO :
हेही वाचा…“हजारे-आव्हाड वाद टोकाला,” अण्णा हजारे आव्हाडांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
हेही वाचा…भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादीमधून आलेला ‘हा’ नेता नकोसा झालाय, “पुन्हा उमेदवारी दिली तर..,” निष्ठावंत आक्रमक
हेही वाचा…शिंदेंच्या बाजूने यंत्रणा उभी? कोर्टात नेमकं काय घडतयं, सुनावणी थेट एक महिन्यानंतर
हेही वाचा…“१२ वर्षानंतर मुलं झालं, अन् तेही गेलं हो..,”सुळेंसमोरच माय धायमोकलून रडली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
हेही वाचा…शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच! भाजपचा शरद पवारांना चिमटा