मुंबई : शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा लांबणीवर गेली आहे. आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेची सुनावणी १ महिन्यांनी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत निर्णय कधी लागणार ? याची प्रतिक्षा आता अजून एक महिन्यानंतर करावी लागणार आहे.
हेही वाचा…“सत्तेच्या डोहात बुडालेल्या सरकारच्या डोक्यात माज भरला, अन् कोर्टात पराभव झाला”
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी लांबणीवर गेली असून ती आता ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. आधी ३ ऑक्टोंबर तारीख देण्यात आली होती. त्यानंतर ६ ऑक्टोंबर, मग ९ ऑक्टोंबर आणि आता थेट ३ नोव्हेंबर देण्यात आल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेबाबत कारवाईसाठी वेळापत्रक ठरवलेलं असतांना सर्वोच्च न्यायालयाने तारीख सातत्याने लांबणीवर त्यामुळे अध्यक्षांच्या वेळापत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्ष मान्यताच दिल्याचं दिसत आहे. यातच केंद्र सरकारचा देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याने यावर आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.
हेही वाचा…“वैद्यकीय मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,’ काॅंग्रेसच्या शिष्ठमंडळाची राज्यपालांकडे मागणी
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणाची आज निवडणुक आयोगात दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळ या चिन्हाबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने दावा सांगितला होता. त्यावर आता निवडणुक आयोगात सुनावणी होत आहे. याप्रकरणाबाबत निवडणुक आयोग नेमका कुणाच्या बाजूने निर्णय देणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“१२ वर्षानंतर मुलं झालं, अन् तेही गेलं हो..,”सुळेंसमोरच माय धायमोकलून रडली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
हेही वाचा…शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच! भाजपचा शरद पवारांना चिमटा
हेही वाचा…“विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी,” ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा सामंतांनी मांडला हिशोब
हेही वाचा…निवडणुक आली की गाजर दाखविण्याचं काम, मोदींजी देशातील जनता तुम्हाला विटलीय
हेही वाचा…मोठी बातमी..! राऊतांच्या धाकट्या भावाला नोटीस, ‘या’ प्रकरणाबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश