मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एकनाथ शिंदे यांचा जर्मनी व ब्रिटन दौरा, राहूल नार्वेकर यांचा घाना, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दावास दौऱ्यावरच्या खर्चावरून आदित्य ठाकरेंनी टिका केली होती. यावर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही प्रश्न उपस्थित करत दाओस दौऱ्याच्यावेळी झालेल्या खर्चाची मांडणी करत ठाकरेंना उत्तर दिलंय.
हेही वाचा…गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं, पुनीत बालन यांना पालिकेचा दणका,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले
परदेश दौऱ्याबाबत ठाकरेंनी ट्विट केल्यानंतर नेत्यांनी परदेश दौरे रद्द केल्याचं ठाकरेंनी म्हटलं होतं. यावर आता २०२२ च्या दावोस दौर्यावर जाण्यासाठी तत्कालीन ऊर्जा मंत्री यांचा विमान, वाहन आणि हॉटेल खर्च कुणी केला? तत्कालीन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री यांचा विमान खर्च, वाहन खर्च आणि हॉटेल खर्च कुणी केला? मंत्री पर्यावरण आणि पर्यटन यांचे OSD यांचा विमान खर्च ,वाहन खर्च आणि हॉटेल खर्च कुणी केला? असा सवाल उदय सामंतांनी ठाकरेंना केले आहेत. यातच वरील दौरा स्वखर्चाने केला असेल तर खरच अभिनंदन असा टोलाही उदय सामंतांनी ठाकरेंना लगावला.
हेही वाचा…शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, आघाडी सरकारचा कोर्टात ‘तो’ मोठा विजय
आदित्य ठाकरे हे दाओस दौऱ्यावर असतांना त्यांच्या चहापान आणि भोजनावर १ कोटी ५ लाख ५० हजार ६९२ रूपये खर्च आल्याचं सांगितलं. तर आदित्य ठाकरे यांच्या निवासासाठी २ कोटी ४० लख १५ हजार रूपये आल्याचं सांगितलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या विमान खर्चासाठी ४४ लाख ६३ हजार तर वाहन व्यवस्थेसाठी ६७ लाख १९ हजार रूपये खर्च आल्याचं उदय सामतांनी म्हटलंय.
*काही प्रश्न अनुत्तरित*..
1)२०२२ च्या दावोस दौर्यावर जाण्यासाठी तत्कालीन ऊर्जा मंत्री यांचा विमान, वाहन आणि हॉटेल खर्च कुणी केला???
2)तत्कालीन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री यांचा विमान खर्च, वाहन खर्च आणि हॉटेल खर्च कुणी केला???
3)मंत्री पर्यावरण आणि पर्यटन यांचे OSD यांचा विमान…— Uday Samant (@samant_uday) October 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुक आली की गाजर दाखविण्याचं काम, मोदींजी देशातील जनता तुम्हाला विटलीय
हेही वाचा…मोठी बातमी..! राऊतांच्या धाकट्या भावाला नोटीस, ‘या’ प्रकरणाबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
हेही वाचा…“सत्तेच्या डोहात बुडालेल्या सरकारच्या डोक्यात माज भरला, अन् कोर्टात पराभव झाला”
हेही वाचा…“वैद्यकीय मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,’ काॅंग्रेसच्या शिष्ठमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…“निकाल काही असो, चिंता करण्याची काही गरज नाही”, निकालाआधी शरद पवारांनी शड्डू ठोकला