मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय व इतर सर्व विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. यामध्ये अनेक महत्वाच्या विकासकामांचा समावेश होता. यातच आता उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या याचिकांमध्ये निर्णय देताना राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. यातच आता उच्च न्यायालयासमोर उर्वरित प्रलंबित याचिकांमध्ये राज्य सरकारने स्वत:हून सर्व स्थगिती सरसकट उठवली आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार घणाघात करत न्यायालयाचे आभार मानले आहे.
हेही वाचा…“आधी महत्वाची खाती काढली अन् आता पुण्याचं पालकमंत्री, चंद्रकांत दादांचं डीमोशन बघवत नाही हो ,”
सत्तेच्या डोहात बुडालेल्या या सरकारच्या डोक्यात माज भरला आहे. स्वतःच्याच अहंकाराने पराभूत झालेल्या या स्थगिती सरकारवर अखेर मविआ सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामांवरील स्थगिती सरसकट उठवण्याची नामुष्की ओढवली आहे. हा सत्याचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हा मविआचा विजय आहे. सरसकट विकास कामांना थांबवून स्थगिती सरकारने काय मिळवले? लोकांना विकासापासून दूर ठेवून काय साध्य केले? असे जनविरोधी, द्वेषाचे राजकारण कशासाठी? असा खोचक सवाल मुंबईच्या काॅंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
हेही वाचा…“भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफजल खानासारखी मिठी मारतो”, मित्र पक्षाचा गंभीर आरोप
दरम्यान, आम्ही न्यायालयात गेलो नसतो तर राज्य सरकारने ही स्थगिती कधीच उठवली नसती. राज्य सरकारने स्थगिती उठवलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करतील अशी आशा करतो. लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत आलो असा कांगावा करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. सत्तेत आल्यानंतर सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे फडणवीस सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते? महाविकास आघाडीसाठी मात्र महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास होता आणि आहे. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी म्हटले आहे.
असे वागायचेच कशाला की नंतर शरमेने मान खाली झुकेल. परंतु सत्तेच्या डोहात बुडालेल्या या अहंकारी सरकारच्या डोक्यात माज भरला आहे म्हणून ही सोपी बाब देखील त्यांच्या आकलनापलीकडची आहे.
स्वतःच्याच अहंकाराने पराभूत झालेल्या या स्थगिती सरकारवर अखेर मविआ सरकारच्या काळात मंजूर झालेल्या… pic.twitter.com/0dHIwMki3q
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“वैद्यकीय मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,’ काॅंग्रेसच्या शिष्ठमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…“निकाल काही असो, चिंता करण्याची काही गरज नाही”, निकालाआधी शरद पवारांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं, पुनीत बालन यांना पालिकेचा दणका,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले
हेही वाचा…शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, आघाडी सरकारचा कोर्टात ‘तो’ मोठा विजय
हेही वाचा…“पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, दोषी नराधमांवर कठोर कारवाई करा,” राष्ट्रवादीची मागणी