छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथील शासकीय रूग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूचे सत्र थांबेना ना. सोमवारपासून २५ पेक्षा जास्त नवजात बालकांचा जीव गेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील एका महिलेचे प्रसुती झाल्यानंतर तिच्या बाळाला नांदेडच्या शासकीय रूग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. परंतु त्याचं दुर्दैवानं मृत्यू झालं. अन् त्यानंतर एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या महिलेची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुप्रिया सुळेंच्या समोरच त्या महिलेने हंबरडा फोडल्याचा व्हिडीओही त्यानंतर प्रंचड व्हायरल झाला.
हेही वाचा…“वैद्यकीय मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,’ काॅंग्रेसच्या शिष्ठमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हातपाय वाकडे झाले. बाळाला झटके येत होते.. बघा बघा विनवण्या केल्या. तरी बघत नव्हते. या डॉक्टरांनी माझ्या बाळाचा जीव घेतला म्हणत पैठणच्या एका मातेने हंबरडा फोडला. आक्रोश करणाऱ्या मातेला शांत व्हा, म्हणून धीर देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना मी कसं शांत राहू. मला १२ वर्षानंतर बाळ झालं. होतं. त्याचाही जीव घेतला हो. या महिलेच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून टाकले. याचा व्हिडीओही चांगलाचं व्हायरल झाला.
हेही वाचा…“निकाल काही असो, चिंता करण्याची काही गरज नाही”, निकालाआधी शरद पवारांनी शड्डू ठोकला
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यानंतर एक ट्विट केलं. त्यात त्यांनी असं म्हटलं की, विष्णुपुरी, नांदेड येथे डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली. या रुग्णालयात शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोठ्या संख्येने रुग्ण दगावले. याठिकाणी आज भेट दिली असता नवजात अर्भक गमावलेल्या एका मातेने मिठी मारुन हंबरडा फोडला. तब्बल १२ वर्षानंतर या मातेची कुस उजवली होती पण शासनाच्या दुर्लक्षामुळे ते बाळ तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं. या मातेचे आणि आपलं माणूस गमावलेल्या लोकांचे अश्रू या सरकारला दिसत नाहीत. आपल्या नाकर्तेपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचे प्राण गेले तरीही हे सरकार मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करीत नाही. उलट संबंधित मंत्र्यांची पाठराखण करीत आहे. संवेदनशील राज्यकर्ते असते तर आतापर्यंत त्या मंत्र्यांचा राजीनामा झाला असता. पण हा आक्रोश ऐकून घेण्याची शासनाची तयारी नाही. हे असंवेदनशील सरकार झोपेचे सोंग घेऊन पडले आहे.
विष्णुपुरी, नांदेड येथे डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली. या रुग्णालयात शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोठ्या संख्येने रुग्ण दगावले. याठिकाणी आज भेट दिली असता नवजात अर्भक गमावलेल्या एका मातेने मिठी मारुन हंबरडा फोडला. तब्बल १२ वर्षानंतर या… pic.twitter.com/3iRMKyif7p
— Supriya Sule (@supriya_sule) October 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच! भाजपचा शरद पवारांना चिमटा
हेही वाचा…“विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी,” ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा सामंतांनी मांडला हिशोब
हेही वाचा…निवडणुक आली की गाजर दाखविण्याचं काम, मोदींजी देशातील जनता तुम्हाला विटलीय
हेही वाचा…मोठी बातमी..! राऊतांच्या धाकट्या भावाला नोटीस, ‘या’ प्रकरणाबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
हेही वाचा…“सत्तेच्या डोहात बुडालेल्या सरकारच्या डोक्यात माज भरला, अन् कोर्टात पराभव झाला”