मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. अण्णा हजारे यांनी आव्हाडांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांच्याबाबत एक ट्विट केले होते. त्याविरोधात अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. माझ्यामुळे देशातील नागरिकांचं भलं झालं, मात्र त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावं लागलं, याची खंत त्यांच्या मनात असावी, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलं आहे.
हेही वाचा…निवडणुक आली की गाजर दाखविण्याचं काम, मोदींजी देशातील जनता तुम्हाला विटलीय
जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारेंचा एक फोटो शेअर केला. यात आव्हाडांनी ‘ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही’, अशी टीका केली होती. या टीकेनंतर अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाडांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील अण्णा हजारे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! राऊतांच्या धाकट्या भावाला नोटीस, ‘या’ प्रकरणाबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
दरम्यान, आव्हाडांनी पुन्हा ट्विट करत अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या ट्विटमुळे ह्यांना जाग आली आहे. कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का? असा खोचक सवाल देखील अण्णा हजारे यांना आव्हाडांनी केला आहे.
माझ्या ट्विट नी ह्यांना जाग आली
कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले
चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का https://t.co/NDixOUJLaw— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादीमधून आलेला ‘हा’ नेता नकोसा झालाय, “पुन्हा उमेदवारी दिली तर..,” निष्ठावंत आक्रमक
हेही वाचा…शिंदेंच्या बाजूने यंत्रणा उभी? कोर्टात नेमकं काय घडतयं, सुनावणी थेट एक महिन्यानंतर
हेही वाचा…“१२ वर्षानंतर मुलं झालं, अन् तेही गेलं हो..,”सुळेंसमोरच माय धायमोकलून रडली, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
हेही वाचा…शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच! भाजपचा शरद पवारांना चिमटा
हेही वाचा…“विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी,” ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा सामंतांनी मांडला हिशोब