पुणे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली सोलापूरला झाल्याने आता तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी एन. के. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एन. के. पाटील यांच्या बदलीवर मवाळमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेनेचे शिंदे गटातील खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांच्यात आता शाब्दिक फटकारे उडले आहेत.
हेही वाचा…“हजारे-आव्हाड वाद टोकाला,” अण्णा हजारे आव्हाडांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार
एन. के. पाटील यांना मावळमध्ये आणून श्रीरंग बारणे नगर परिषदेचा बट्याबोळ करून आता घरात बसले आहेत. अशी टिका सुनील शेळके यांनी केली आहे. त्यावर तळेगावचे मुख्याधिकारी काय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह, पीएमआरडीएचे आयुक्त महिवाल यांनाही मीच आणले, असं म्हणत श्रीरंग बारणे यांनी सुनील अण्णा शेळकेंना प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादीमधून आलेला ‘हा’ नेता नकोसा झालाय, “पुन्हा उमेदवारी दिली तर..,” निष्ठावंत आक्रमक
पुर्वीचे कार्यक्षम मुख्याधिकारी विजय सरनाईक यांची टर्म पूर्ण होण्याच्या आत बदली करून तेथे अकार्यक्षम पाटील यांना बारणे यांनी आणले, त्यामुळे नगरपरिषदेच्या कारभाराचा बट्टाबोळ झाल्याने शेळके बारणे यांच्यावर भडकले होते. त्यावर आता आपल्याला कोणी याठिकाणी आणले नसून राज्य सरकारच्या आदेशाने आपण आल्याचे सांगून विजय सरनाईक यांनी प्रतिनिधींच्या या शाब्दिक चकमकीला पुर्णविराम दिला.
READ ALSO :
हेही वाचा…“संकट आल्यावर एक फुल दोन हाफ कुठे गेले ?” उद्धव ठाकरे राज्य सरकारवर संतापले
हेही वाचा…ठाकरेंची ‘ती’ चूक शरद पवार टाळणार, अन् निवडणुक आयोगाचा निकाल जिंकणार ? वाचा सविस्तर
हेही वाचा…बारामती अॅग्रोबाबत रोहित पवारांना हायकोर्टाचा पुन्हा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे दिले आदेश
हेही वाचा…“तर तुमच्या कानाजवळ डी.जे वाजवल्याशिवाय राहणार नाही,” सुषमा अंधारेंना ‘कोणी’ दिला इशारा
हेही वाचा…वडिलांवरील टिका श्रीकांत शिंदेंच्या जिव्हारी लागली, अन् आजी माझी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये वाकृयुद्ध रंगलं