परभणी : राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या आठवड्याभरापासून निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे, परंतु राज्य सरकार असंवेदनशीलपणे या दुर्दैवी घटनांकडे दुर्लक्ष करत आहे. एका व्यक्तीचा पाय मुरगळला आणि डॉक्टरांनी उपचार करताना त्याला चुकीचे इंजेक्शन दिले. परिणामी त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची परभणीच्या शासकीय रुग्णालयातील घटना अतिशय धक्कादायक आहे. यावरून आता राष्ट्रवादीने सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा…बारामती अॅग्रोबाबत रोहित पवारांना हायकोर्टाचा पुन्हा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे दिले आदेश
राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार थांबता थांबेना परभणीत चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला गमवावा लागला जीव गमावावा लागला. राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील दुरावस्था, औषधोपचारांचा अभाव तसेच चुकीच्या उपचारपध्दती यामुळे अनेक रुग्णांना प्राणाला मुकावे लागत आहे. प्रशासकीय यंत्रणांच्या हलगर्जी कारभारामुळे अशाप्रकारे मृत्यू होत असताना देखील राज्य सरकार कुठलीच ठोस पावलं उचलताना दिसून येत नाही. राज्य सरकारने आरोग्य यंत्रणांच्या या भोंगळ कारभाराकडे जातीने लक्ष देऊन निष्पाप जीवांच्या मृत्यूचे सत्र थांबवावे, ही कळकळीची विनंती असं राष्ट्रवादीने म्हटलंय.
हेही वाचा…“तर तुमच्या कानाजवळ डी.जे वाजवल्याशिवाय राहणार नाही,” सुषमा अंधारेंना ‘कोणी’ दिला इशारा
दरम्यान, पाय मुरगळला म्हणून सकाळी रूग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर पाच तारखेला माझी सही न घेता ऑपरेशन झालं आणि इंजेक्शन दिलं. अन् त्यांच्या तोंडाला फेस आला. आमचा पेशंट स्टेबल होता आणि त्यानंतर सिरीयस झाला. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करून आमच्या सह्या घेतल्या. परंतु मी सही दिली नाही. त्यानंतर त्यांना आयसीयु मध्ये दाखल करून घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर व्यवस्थित उपचार केला नाही. अन् डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमचा पेशंट दगावला असं रूग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं.
राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार थांबता थांबेना…
-परभणीत चुकीच्या उपचारामुळे रुग्णाला गमवावा लागला जीव!राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या आठवड्याभरापासून निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे, परंतु राज्य सरकार असंवेदनशीलपणे या दुर्दैवी घटनांकडे…
— NCP (@NCPspeaks) October 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलं, पण ठाकरेंवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले अन्..,” ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…शिंदे अन् अजित पवार गटातले नेते भिडले, अन् अधिकाऱ्यांनी एका वाक्यात विषय संपवला
हेही वाचा…“संकट आल्यावर एक फुल दोन हाफ कुठे गेले ?” उद्धव ठाकरे राज्य सरकारवर संतापले
हेही वाचा…ठाकरेंची ‘ती’ चूक शरद पवार टाळणार, अन् निवडणुक आयोगाचा निकाल जिंकणार ? वाचा सविस्तर