पुणे : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत आता निवडणुक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गटाची लढाई सुरू झाली आहे. यातच आज निवडणुक आयोगात दोन्ही गटातील वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यातच जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर असून शरद पवार आपल्या पक्षात मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. तर अजित पवार गटाचे सर्व दावे शरद पवार गटाने खोडून काढले. त्याआधी बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात जनता आता नाराज झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…शिंदे ठाकरेंच्या विरोधात आक्रमक, मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी मातोश्रीपर्यंत जाण्याचे संकेत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनााखाली तरडोली ग्रामस्थांच्या वतीने पुणे-बारामती रस्ता रोको करण्यात आला होता. या रस्ता रोकोदरम्यान आंदोलक विजय भोसले यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित दादा तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं? असा खळबळजनक आरोप अजित पवारांवर केलाय.
हेही वाचा…पाय मुरगळला, इंजेक्शन दिलं अन् रूग्ण दगावला, सरकारच्या आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार थांबता थांबेना
दरम्यान, आम्ही कोणतेही काम पवार साहेबांकडे घेऊन गेलो तर पवार साहेब सांगतात, राज्यातील सुत्र अजित पवारांकडे दिली आहेत. कोणत्याही गाव पुढाऱ्यांना विचारल्यावर ते म्हणतात की, हे प्रश्न दादाच सोडवू शकतात. पण दादा आपला कुठलाच प्रश्न मार्गी लावणार नाहीत. त्यामुळे युवकाने जागे व्हा, सावध व्हा, असे म्हणत युवकांना इशाराहि दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद, थेट शरद पवारांवर केले गंभीर आरोप
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात घमासान, अजित पवार गटाने आणले गाडीभर पुरावे
हेही वाचा…“जयंत पाटलांची नियुक्ती बेकादेशीर,” निवडणुक आयोगात अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळाबाबत सुनावणी सुरू,आयोगात ‘हे’ बडे वकिल युक्तिवाद करणार
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निकालाआधीच शरद पवार गटाची मोठी खेळी, दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या