मुंबई : राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षनावाबाबत आज सुनावणीच्या वेळी जयंत पाटलांची नियुक्ती अजित पवार गटाने बेकायदेशी असल्याचं म्हटलं. जयंत पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारणीला धरून नसून त्यांचा कार्यकाळ संपल्यावर नियुक्ती करण्यात आली. असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात करण्यात आला. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निकालाआधीच शरद पवार गटाची मोठी खेळी, दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या
माझी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फार्म देण्यात आले. जर मी बेकायदेशीर असेल तर उत्तर महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदार देखील बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव दिसतोय. मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे, मी निवडून आल्यानंतर प्रफुल पटेल यांनीच मला पत्र दिले. संख्याबळाबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील. कालच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आहे, त्यामध्ये 24 राज्यांपेक्षा जास्त अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिलाय, अशी पहिली प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी सुनावणीवर दिली.
हेही वाचा…शिंदे ठाकरेंच्या विरोधात आक्रमक, मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी मातोश्रीपर्यंत जाण्याचे संकेत
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील ५३ पैकी ४२ आमदार आणि विधानपरिषदेतील ९ पैकी ६ आमदार आमच्याकडे आहेत. यातच लोकसभेतील पाच खासदारांपैकी १ आणि राज्यसभेतील ४ खासदारांपैकी १खासदार आमच्या बाजूनं असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला, त्यामुळे आमदारांची संख्या महत्वाची असून त्याआधारे पक्ष कुणाचा ठरवता येईल असंही अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित दादा तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं?” बारामतीकरांचा अजितदादांना सवाल
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद, थेट शरद पवारांवर केले गंभीर आरोप
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात घमासान, अजित पवार गटाने आणले गाडीभर पुरावे
हेही वाचा…“जयंत पाटलांची नियुक्ती बेकादेशीर,” निवडणुक आयोगात अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळाबाबत सुनावणी सुरू,आयोगात ‘हे’ बडे वकिल युक्तिवाद करणार