मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सातत्याने मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यावर टिका करतांना दिसत आहेत. यातच आता सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर टिका करतांना नातवाचाही उल्लेख केला आहे. यावरून शिवसेनेचे नेते सुषमा अंधारे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा मनसेचे नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिला. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी शालिनी ठाकरेंचा आवाहन दिलंय.
हेही वाचा…“जयंत पाटलांची नियुक्ती बेकादेशीर,” निवडणुक आयोगात अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद
शालिनी ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ट्विट करत शालिनी ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. भडकले, गुर्गरले, डीजे, जाळ, डरकाळी अरे बापरे, बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी निशस्र् एकटी यायला तयार आहे. पण खरं सांगा, नांदेड, संभाजीनगरचे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का ? असा खोचक सवालही सुषमा अंधारे यांनी केलाय. तसेच मी मुद्यावर बोलतेय, चिप पल्बिसिटीसाठी लुडबूड का करताय. ? असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळाबाबत सुनावणी सुरू,आयोगात ‘हे’ बडे वकिल युक्तिवाद करणार
शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना एक पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, हिंदू सण उत्साहाने साजरे झालेच पाहिजेत यासाठी राजसाहेबांनी अनेकदा ठाम भूमिका घेतली आहे. मात्र काही हिंदू सणांमध्ये डी. जे. आणि लेझर लाईट मुळे होणारा त्रास याबाबत ही रोखठोक भूमिका घेवून त्यास विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेने तसेच सर्व पक्षातील संवेदनशील माणसांनी याचे स्वागत केले. हीच बाब बहुदा तुम्हाला रुचली नसल्याचे दिसतय. असं म्हटलंय.
भडकले..गुर्गुरले..dj…जाळ..डरकाळी..अरे बापरे..
बाई,
ठिकाण , वेळ, दिवस तुम्ही ठरवा. मी नि:शस्त्र एकटी यायला तयार आहे.
पण खरं सांगा, नांदेड संभाजीनगर चे बळी याबद्दल तुमच्या आतड्याला अजिबात पिळ पडत नाही का? मी मुद्द्यावर बोलतेय, चिप पब्लिसिटीसाठी लुडबुड का करताय? @ShivSenaUBT_— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) October 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या एका गटाला फायदा तर दुसऱ्या गटाला फटका, निवडणुक आयोग ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत
हेही वाचा…“तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार बेकायदेशीर ठरतील,” जयंत पाटलांनी मांडलं गणित
हेही वाचा…“अजित दादा तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं?” बारामतीकरांचा अजितदादांना सवाल
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद, थेट शरद पवारांवर केले गंभीर आरोप
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात घमासान, अजित पवार गटाने आणले गाडीभर पुरावे