पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणं बदलली आहे. पालकमंत्रीपद आल्यानंतर पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आनंद साजरा केला. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी यामुळे धसका घेतल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता पुणे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पदही अजिदादांकडे आल्यानंतर समितीत फेररचना होण्याची शक्यता असून यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना आपलं पद जाणार याची धास्ती भरली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात घमासान, अजित पवार गटाने आणले गाडीभर पुरावे
सुरूवातीपासून पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु अलिकडे महापालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीची उतरती कळा लागली. यातच आता अजित पवार पुन्हा सत्तेत सामील होऊन पुण्याच्या पालकमंत्री पदी विराजमान झाल्याने राष्ट्रवादीला फायदा तर भाजप-शिवसेनेला तोटा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच पुणे जिल्हा समितीत आता मोठे बदल होण्याची शक्यता असून या समितीत भाजपच्या कोणत्या नेत्यांना डच्चू देऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेतलं जाईल, याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“जयंत पाटलांची नियुक्ती बेकादेशीर,” निवडणुक आयोगात अजित पवार गटाचा मोठा युक्तिवाद
चंद्रकांत पाटील पालकमंत्री असतांना या समितीत भाजपचे विजय फुगे, काळूराम नढे हे तर मावळातून राज्यमंत्री बाळा भेडगे आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे सदस्य आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अजित पवार याठिकाणी आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुणाचा पत्ता कट होणार अन् कुणाची वर्णी लागणार ? याची धास्ती आता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह पुण्यातील राजकारण्यांना याची उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळाबाबत सुनावणी सुरू,आयोगात ‘हे’ बडे वकिल युक्तिवाद करणार
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या आणि विकासाचा ड्राफ्ट तयार करण्याची जबाबदारी असलेल्या समितीत आमदारांतून भाजपचे भीमराव तापकी, राहुल कुल, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नॉमिनेटेड सदस्य म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश बीडकर, माजी मंत्री विजय शिवतारे, तसेच जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्य आशआ बुचके, राहुल पारच्णे आदिंसह पिंपरी-चिंचवडमधून भाजपचे विजय फुगे, काळूराम नढे आहेत. त्यातील आता विद्यमान आमदार, खासदार कायम राहणार आहेत. मात्र, माजी आमदार, खासदारांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा…!”मनसेच्या महिला नेत्याचं आवाहन सुषमा अंधारेंनी स्विकारलं
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या एका गटाला फायदा तर दुसऱ्या गटाला फटका, निवडणुक आयोग ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत
हेही वाचा…“तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार बेकायदेशीर ठरतील,” जयंत पाटलांनी मांडलं गणित
हेही वाचा…“अजित दादा तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं?” बारामतीकरांचा अजितदादांना सवाल
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद, थेट शरद पवारांवर केले गंभीर आरोप