मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणुक केल्याचं अत्यंत गंभीर निरीक्षण नोंदवलं आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये गुंतवणुक केल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हसन मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा, अशी मागणी लावून धरली आहे.
हेही वाचा…“अजित दादा तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं?” बारामतीकरांचा अजितदादांना सवाल
सरसेनपाती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉंड्रिंगप्रकरणी हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरव यांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. गुरव यांना हसन मुश्रीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांकडून मिळालेल्या पैशांची पूर्ण कल्पना होती. हा पैसा शेल कंपन्यांमध्ये वळवण्यात आला असल्याचे तपासात उघड झालं आहे. शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांचाही सीए गुरव यांना कल्पना होती. मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी कट रचून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्यांची फसवणूक केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी कुणाची ? निवडणुक आयोगात जोरदार युक्तिवाद, थेट शरद पवारांवर केले गंभीर आरोप
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे अत्यंत गंभीर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. भाजपमध्ये काही प्राणाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी त्वरित शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, अशी माणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच पुढच्य दहा ते बारा दिवसांत या मंत्रिमंडळातील ९ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे अत्यंत गंभीर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
भाजपमध्ये काही प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यांनी त्वरित शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“लोकभावनेची झुळूक जर आली तर..,” शरद पवारांच्या ‘या’ पट्टशिष्यांनी अजित पवार गटाला दिला धोक्याचा इशारा
हेही वाचा…अजिदादा पुण्याचे पालकमंत्री होताच भाजप अन् शिंदेंच्या नेत्यांमध्ये धास्ती, डीपीसीमधून ‘या’ नेत्यांची होणार गच्छंती
हेही वाचा…“बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा…!”मनसेच्या महिला नेत्याचं आवाहन सुषमा अंधारेंनी स्विकारलं
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या एका गटाला फायदा तर दुसऱ्या गटाला फटका, निवडणुक आयोग ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत
हेही वाचा…“तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार बेकायदेशीर ठरतील,” जयंत पाटलांनी मांडलं गणित