पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून येण्याकरिता तन मन धनाने अजितदादा यांच्यासारखा भाऊ सुप्रिया ताईंच्या पाठीशी आहे, म्हणून आजपर्यंत सुप्रियाताई बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून येतात. असं विधान अजित पवार गटातले आमदार अमोल मिटकरी यांनी केले होते. त्यावर सुप्रिया सुळेंनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागितली आहे.
हेही वाचा…“लोकभावनेची झुळूक जर आली तर..,” शरद पवारांच्या ‘या’ पट्टशिष्यांनी अजित पवार गटाला दिला धोक्याचा इशारा
वाशिममध्ये आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळेंवर भाष्य केले होते. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काॅंग्रेसने पक्षाने तन आणि मन लावून नेहमीच लढाई लढली आहे. मात्र धनाचे राजकारण आम्ही कधी केले नाही आणि करणार नाही. अमोल मिटकरी यांचा गैरसमज आहे की, आम्ही धनाने निवणूक लढतो, त्यांचं मला माहिती नाही पण अजितदादा आणि मी आजवर धनाने निवडणुक लढलो नाही, धन आणि निवडणुक राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबीय यांच्यात गल्लत करू नका, अशी विनंती करत सुप्रिया सुळे यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिलं होतं.
हेही वाचा…अजिदादा पुण्याचे पालकमंत्री होताच भाजप अन् शिंदेंच्या नेत्यांमध्ये धास्ती, डीपीसीमधून ‘या’ नेत्यांची होणार गच्छंती
दरम्यान, खासदार सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहीण आहेत. संसदमध्ये महिला आरक्षणावर त्यांनी जे अभ्यास पूर्ण भाषण केलं त्याला धरून माझं भाषण होतं. भाषण कट करून काही भाग त्यांना दाखवण्यात आला. तन-मन-धन हा शब्द मी वेगळ्या अर्थाने वापरला. चुकीबद्दल एक भाऊ म्हणून मी माफी मागतो. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळे यांची माफि मागितली आहे.
खा.सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहीण आहेत. संसदमध्ये महिला आरक्षणावर त्यांनी जे अभ्यास पुर्ण भाषण केलं त्याला धरून माझं भाषण होतं . भाषण कट करून काही भाग त्यांना दाखवण्यात आला .तन-मन-धन हा शब्द मी वेगळ्या अर्थाने वापरला. चुकीबद्दल एक भाऊ म्हणून मी माफी मागतो.@supriya_sule
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…बावनकुळेंसोबत वाद, अन् आता फडणवीसांकडून बच्चू कडूंचं कौतूक, नेमकं शिजतंय तरी काय ?
हेही वाचा…नाशकात अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टॉमॅटोचा वर्षाव, शेतकरी आक्रमक, ताफा अडविण्याचा प्रयत्न
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ चार शिलेदारांकडे पुण्याची जबाबदारी, संपूर्ण शहर पिंजून काढणार
हेही वाचा…“काॅंग्रेसला एकही मत मिळणार नसणाऱ्या बुथ अध्यक्षाला ५१,०० रूपयांचे बक्षीस देऊ”, ‘या’ भाजप नेत्याची घोषणा
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या ९ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, त्याआधी मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”