पुणे : आगामी वर्षात संपुर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी आता जागावाटपावरून महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या वाद सुरू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटासह अजित पवार गट आग्रही असल्याने याठिकाणी आता मोठा पेच निर्माण झाला आहे. अशातच आता ठाकरे गटाने देखील या लोकसभा मतदारसंघावर लक्ष घातलं असून उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याने या लोकसभा मतदारसंघाची लढत रंगतदार होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेसला एकही मत मिळणार नसणाऱ्या बुथ अध्यक्षाला ५१,०० रूपयांचे बक्षीस देऊ”, ‘या’ भाजप नेत्याची घोषणा
मावळ लोकसभा मतदारसंघातून २०१९ ला शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवारांचा पराभव केला होता. अजित पवार आता महायुतीत सामील झाल्याने या लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट आमनेसामने आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिकीटावर आता दोन्ही गट आग्रही असतांना ठाकरे गटाने या मतदारसंघात नवा भिडू करणार असून दोन्ही गटांना मोठा झटका दिला आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या ९ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, त्याआधी मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसची ताकद मोठी आहे. कारण पिंपरी चिंचवड, मावळ तसेच पनवेल, कर्जत आणि उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ असून पिंपरी आणि मावळच्या आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. तर रायगड हा राष्ट्रवादी बालेकिल्ला आहे. परंतु तरीही राष्ट्रवादीसाठी मागीली निवडणुकीत मोठा पराभव स्विकारा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या ताकदीनिशी अजितदादा या लोकसभेसाठी तयारी करणार असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…“लोकभावनेची झुळूक जर आली तर..,” शरद पवारांच्या ‘या’ पट्टशिष्यांनी अजित पवार गटाला दिला धोक्याचा इशारा
दरम्यान, महाविकास आघाडीकडून ठाकरे गट मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. भाजप-शिंदे आणि अजित पवार गट एकत्रित असल्याने ठाकरेंना या लोकसभेसाठी मोठा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे ठाकरेंची भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भेट घेतली होती. यातच मावळ दौऱ्यानिमित्ताने जयंत पाटलांनी देखील वाघेरेंची भेट घेतली होती. त्यामुळे आता संदीप वाघेरे यांना मावळमधून मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज ठाकरेंनी लोकसभेसाठी निवडले ‘९’ तगडे उमेदवार, भाजपसह, राष्ट्रवादी, काॅंग्रेसवरही भारी पडणार ?
हेही वाचा…“चुकीबद्दल एक भाऊ म्हणून माफी मागतो”, आधी टिका नंतर माफी, सुप्रिया सुळेंवरील ‘ती’ टिका मिटकरींना भोवली
हेही वाचा…बावनकुळेंसोबत वाद, अन् आता फडणवीसांकडून बच्चू कडूंचं कौतूक, नेमकं शिजतंय तरी काय ?
हेही वाचा…नाशकात अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टॉमॅटोचा वर्षाव, शेतकरी आक्रमक, ताफा अडविण्याचा प्रयत्न
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ चार शिलेदारांकडे पुण्याची जबाबदारी, संपूर्ण शहर पिंजून काढणार