पुणे : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झाला. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. राज्यासह पुण्यातही राष्ट्रवादीच्यावतीने दरेकरांच्या निषेधार्थ आंदोलन कऱण्यात आले आहे. “प्रविण दरेकर हाय हाय”, “प्रविण दरेकरांच करायच काय, खाली मुंडके वर पायं”, “प्रविण दरेकरांनी शेण खाल्ल, शेण खाल्लं शेणं खालं”, अशा प्रकारच्या घोषणा देवून राष्ट्रवादी महिलांच्या वतीने पुण्यात दरेकरांचा निषेध नोंदवण्यात आला आहे. शिवाय, प्रवीण दरेकांनी ४८ तासांच्या आत महिलांची माफी मागितली नाही तर पुण्यात तर फिरकूच देणार नाही. परंतू, राज्यात जिथे कुठे दिसाल तिथे येवून गाल लाल करून तोंडाला काळे फासू, असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आला.
मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही, ‘पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही!’
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवरून टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झाला आहे. ‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीसह चौहोबाजूने दरेकरांवरबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नेता कसा असावा हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सामजून घ्याव. नेता असावा तर आमच्या पवार साहेबांसारखा असावा, ज्यांनी स्त्रीयांबद्दल ज्यांनी स्त्रीयांचा सन्मान कसा करावा हे शिकवले. दरेकरजी, स्त्री ही माता असते, लक्ष्मी असते, सरस्वती असते हे सर्वांनाच माहित आहे. त्याच बरोबर ती दुर्गीही असते. परंतू, दुर्गेच नाही एकली तर तीच कालीमातेमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागत नाही, असा शब्दात महिलांच्या वतीने इशारा देण्यात आला.
राज्यातील ‘असुरक्षित’ सावित्रीच्या लेकींसाठी अखेर मुख्यमंत्री आले धावून
शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, प्रवीण दरेकांना अकलेचे तारे तोडंले. त्याचा समाचार घेण्यासाठी, धिक्कार कऱण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केले आहे. ज्यांची नगरसेवक होण्याची लायकी नाही त्यांना विरोध पक्षनेता केल्यावर काय बोलव हे काय कळणार. मनसे लाटेत, त्यानंतर मोदी लाटेत त्यांना विजय मिळविला. परंतू, मुंबई बँकेचा घोटाळा देखिल सर्वांना माहित आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिले. त्यांना मानसन्मानाची वागणूक दिली. परंतू, हे सगळे बाजून ठेवून भाजप महिलांनाच बाजूला कऱण्याच प्रयत्न करत आहे. प्रवीण दरेकरांना ४८ तासांच्या आत माफी मागितली नाही. तर राज्यात दिसाल तिथे येवून गाल लाल करू, तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला.
Read Also :
- हसन मुश्रीफांना कोणी ओळखत नाही, पेपरमध्ये बातमी यावी म्हणून, माझ्यावर आरोप करतात – समरजीत घाटगे
- ‘…तर महाराष्ट्रावर येऊ शकतं अंधाराचं राज्य!’, ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिला इशारा
- पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा होणार; ठाकरे सरकारविरोधात उद्या भाजपचे राज्यभर आंदोलन
- मोठी बातमी! करुणा शर्मा यांना दिलासा नाही; तुरुगांतील मुक्काम वाढला
- ‘माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार’, दरेकरांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया