मुंबई : सुरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारात गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आली आहे. ज्यामध्ये सुरच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सुरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरे व्यवसाय बंद करून सुरतला स्थलंतरित करीत आहेत. यामुळे राज्याला तब्बल १७ हजार लाख कोटी रूपयाचा फटका बसणार आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले,” पटोलेंचा हल्लाबोल
आज केवळ १७००० कोटीचा हिऱ्यांचा व्यवसाय गेला आहे, अजून दीड लाख कोटींचा हिरे व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरीत होणार आहे. लाखो कोटींची उलाढाल असलेला बॉम्बे डायमंट बोर्स डोळ्यादेखल संपवून आपल्या हक्काचे रोजगार पळवले जात असतील तर आपण शांत बसायचे का ? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.
हेही वाचा…“मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा,” सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
तसेच पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल? अशा प्रकारे तडजोड करून महाराष्ट्राशी गद्दारी करणे योग्य नाही. पुन्हा येण्यापेक्षा महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी किंवा महाराष्ट्राचे वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणे हेच आज महाराष्ट्राला अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राचे युवा हे करतीलच हे पुन्हा येण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी लक्षात घ्यावे असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय.
एका मोठ्या हिरे व्यावसायिकाने आपला १८००० कोटीची उलाढाल असलेला ‘बॉम्बे डायमंड बुर्स’मधील व्यवसाय सुरत डायमंड बुर्समध्ये स्थलांतरीत केल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.
मुंबईचा हिरे व्यापार गुजरातला पळवण्याचा घाट घातला जात असल्याचा मुद्दा गेल्या अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून देत… pic.twitter.com/LjBbzrDqJA
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांना बारामतीतच प्रवेशबंदी, आजचा कार्यक्रम होणार रद्द ? पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…२०२४ ला लोकसभा निवडणुकाचा गुलाल उधळणार, निवडणुक आयोगाने उचललं मोठं पाऊल
हेही वाचा…भुजबळांना धक्का देणारी बातमी, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी शरद पवारांचा हात धरला, पक्ष प्रवेशाने अजित पवार गटातही वाढली धाकधुक
हेही वाचा…मराठा समाजाचा दणका..! परभणीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात, निवडणुक आयोगाने रद्द केली निवडणुक