मुंबई : आज दिवसभर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच गोष्टीची चर्चा होती, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी युपीएमध्ये हालचाली होत आहेत आणि यासाठी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर पुढाकार घेत आहेत याची.
सूत्र : प्रशांत किशोर यांचं वक्तव्य, शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
मात्र, यावर आता खुद्द शरद पवार यांनीच मौन सोडलं असून, “प्रशांत किशोर यांनी माझ्याशी किंवा माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत इतर कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षाची चर्चा केल्याचं वृत्त निराधार आहे. माझा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे युपीएकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काय गणित मांडलं गेलं आहे, याची मला माहिती नाही,” असं भाष्य त्यांनी केलं आहे.
मोठी बातमी : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश?
“३ वेळा प्रशांत किशोर यांनी माझी भेट घेतली. मात्र, आमच्या भेटी राजकीय नव्हत्या आणि त्यात २०२४ च्या निवडणुकीवर कोणतीही चर्चा झाली नाही,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, २०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे यूपीएकडून पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्यासाठी, प्रशांत किशोर यांच्या पुढाकाराने प्रयत्न केले जात बोललं जात होतं.
Read Also :
- शरद पवार ‘पंतप्रधान’ पदासाठी योग्य की ‘राष्ट्रपती’ पदासाठी? शिवसेनेने मांडली स्पष्ट भूमिका
- ‘‘स्वबळाची तयारी सुरु केली आहे कारण…” नाना पटोलेंनी केला मोठा खुलासा!
- कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणारच – चंद्रकांत पाटील
- “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे, २०२४ मध्ये काँग्रेसच नंबर एकची पार्टी”
- “निवडणुका एकटेच लढणार आहात का? निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा”