दिल्ली : नुकतीच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेनं जोर धरला आहे.
कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणारच – चंद्रकांत पाटील
यातच आता, या बैठकीसंदर्भातील अजून एक नवीन बातमी समोर येत असून, आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांवरही यात चर्चा झाली असून, राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्याची माहिती समोर येत आहे.
“महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे, २०२४ मध्ये काँग्रेसच नंबर एकची पार्टी”
शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचा चेहरा करण्यासाठी किशोर यांनी, देशभरात मोर्चेबांधणी सुरू केली असून, त्या पार्श्वभूमीवर ते देशभरातील दिग्गज नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची ३ वेळा भेट घेतली आहे. यापैकी एका बैठकीला पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही हजेरी होती.
मोठी बातमी : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश?
२०२२ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामुळे पुढील वर्षभरात राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. त्यामुळे शरद पवार विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचा चेहरा असतील असं निश्चित मानलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
“निवडणुका एकटेच लढणार आहात का? निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा”
तसेच, २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तोडीसतोड आव्हान देण्यासाठी आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी आणि आगामी पंजाब किंवा उत्तर प्रदेश विधानसभेच्या मुद्द्यावर देखील यात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Read Also :
- “३० वर्षे शिवसेनेत काम, पण सन्मान नाही; शिवसेना आमदाराची खंत”
- ”राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात, मात्र…” उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
- ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका!
- एकनाथ खडसेंना अडकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सापळा रचला – प्रवीण दरेकर
- फडणवीस सरकारने दाबून ठेवलेला झोटिंग समिती अहवाल सापडला