मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपने अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे, ठाणे आणि बारामती भाजपने अजित पवार यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला आहे. तर राज्यातील भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टिका करत पाकिस्तान पाठवण्याची भाषाही केली आहे. त्यावर राषट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटली यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“राज्यपाल महाराजांची बदनामी करत होते, तेव्हा भाजप कुठल्या बिळात होती”; राष्ट्रवादीचा सवाल
या प्रकरणावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अजित पवारांवर टिकास्त्र सोडलं आहे. अजित पवार यांचा मी निषेध व्यक्त करणार नाही, पण त्यांना छत्रपती संभाजीराजे माहिती नसतील, तर ते धर्मवीर होते हे माहिती नाहीत तर त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची गरज आहे. अशी टिका नरेंद्र पवार यांनी केले आहे.
“बारामती अजित पवारांचा पुतळा जाळला, नाशिक, पुण्यात भाजपकडून जोरदार आंदोलन”
नरेंद्र पवार यांच्या टिकेला रूपाली पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज, महापुरूषांबद्दल बेता वक्तव्य केले होते, त्यावेळी हे भाजपचे नेते कुठे गेले होते, आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू असा टोला रूपाली पाटलांनी लगावला आहे.
Read also
- “केंद्रात भाजप सरकार आहे, तोपर्यंत सोमय्यांच्या माकड उड्या सुरू”
- अब्दुल सत्तारांचा गेम होणार..? संपत्तीप्रकरणी तब्बल 1400 पानांची तक्रार CBI कडे दाखल
- “अंगावर आलात तर तुम्हालाही शिंगावर घेऊ”; राष्ट्रवादीचा कडक इशारा
- शिंदे गटाचे फायर ब्रॅंड आमदार शहाजी बापूंनी घटवलं 8 किलो वजन, कारण आलं समोर
- “लोकसभेसाठी मुनगंटीवार, अन् बावनकुळेंचं नाव चर्चेत, मराठवाड्यातील 8 ही जागा भाजप लढवणार”