चंद्रपुर : आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज चंद्रपुर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याच्या वेळी भाजपच्या मिशन 145 चं देखील शुभारंभ करणार आहे. यातच मराठवाड्यातील आठही जागा लढवणार असून यामध्ये राज्यातील महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.
“नितेश राणेंनी आपली उंची अन् लायकी पाहून बोलावे, नाहीतर धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल”
केंद्रात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका देखील जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य आहे. यातच मराठवाड्यातील आठही जागा भाजप लढवणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. तसेच चंद्रपुरमधून लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची देखील चर्चा सध्या रंगली आहे.
ठरलं तर…! 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल या तारखेला वाजणार..?
दरम्यान, जे. पी. नड्डा यांच्या कार्यक्रमातील पत्रिकेवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचं नाव गायब असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अलिकडेच झालेल्या बीड च्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे भाजप आगामी निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार ? ते पण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “राज्यपाल महाराजांची बदनामी करत होते, तेव्हा भाजप कुठल्या बिळात होती”; राष्ट्रवादीचा सवाल
- “बारामती अजित पवारांचा पुतळा जाळला, नाशिक, पुण्यात भाजपकडून जोरदार आंदोलन”
- सोमय्या हा काही महात्मा नाही, ज्यांच्यावर भ्रष्ट्रचाराचे आरोप केले त्यांचं पुढे काय झालं?
- “संजय राऊत म्हणजे जनतेसाठी विटलेली भाजी आणि कडी”, भाजपची जोरदार टिका
- “भाजपचं लक्ष्य 145 असेल तर शिंदे गट काय भाजपची धुणीभांडी करणार”?