मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मवीर पदवीवरून राज्यात वाद सुरू झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत याबद्दल भाष्य केलं होते. त्यावरून भाजपच्या आमदारांकडून अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांना राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यामधून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चंबू देसाई म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना शंभुराज देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर
धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर कधीच कळणार नाही. हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजेंनी जो काही बलिदान दिला. इस्लामच्या समोर न झुकता. त्या औरंग्याला आपली जागा दाखवली. हिंदु धर्माचे वेगवेगळे ग्रंथ लिहिले. अशा धर्मवीरांना समजणं हे राष्ट्रवादीला आणि पवारांना कधीच जमणार नाही. त्यामुळे अजित पवारांनी विरोधी पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
“विनायक मेटेंची राहिलेली स्वप्न आम्ही पुर्ण करू”; फडणवीसांनी दिला मोठा आधार
त्यावरून आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नितेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे यांनी आपली उंडी आणि लायकी पाहून अजित पवार यांच्यावर टिका करावी, अन्यथा धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल, असा इशाराही त्यांनी नितेश राणे यांना दिला आहे.
“सरकारमधील एक चंबू देसाई त्यांच्या तोडांचा चंबू झालाय”; भास्कर जाधवांची शंभूराज देसाईंवर खोचक टिका
दरम्यान, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी तर थेट सत्ताधारी पक्षातील नेत्यांना यावरून आव्हान दिलं आहे. संभाजी राजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर? यावर सत्ताधारी आमदारांनी माझ्यासमवेत वादविवाद करावा, यात जो हरला त्याने पदाचा राजीनामा द्यावा, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीचे बुलढाणा तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी आयोजित केलेल्या महापुरूष सन्मान यात्रेचा समारोप देऊळघाट येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
नितेश राणे यांनी आपली “उंची”आणि लायकी पाहून अजित दादा पवार यांच्यावर टीका करावी अन्यथा धरणातल्या पाण्याने आंघोळ घालण्यात येईल.@NiteshNRane
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) January 2, 2023
राजीनामा दया .. pic.twitter.com/gC4Jxwejam
— nitesh rane (@NiteshNRane) January 1, 2023
Read also
- ठरलं तर…! 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल या तारखेला वाजणार..?
- “जो हरला त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा”, अमोल मिटकरींनी थेट दिलं आवाहान
- “भुरटी लोक, बिन बुडाची पेंद्याची कुठेही जातात,”; राज ठाकरे अन् राणेंच्या भेटीवर ठाकरे गटाची जहरी टिका
- संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य..! फडणवीसांनी अजित पवारांना घेतले धारेवर
- “ज्यांना मंत्रिपद मिळाले नाहीत, ते आमच्यातीलच नेते माझ्याविरोधात कट रचताहेत”; सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट