औरंगाबाद : मला बदनाम करण्यासाठी माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत आहेत. ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरू आहे. असं वक्तव्य करत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा गौप्यस्फोट आणला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सध्या रंगली आहे.
धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये”, बावनकुळेंचा एका वाक्यात पवारांचा समाचार
गेल्या काही महिन्यांपासून अब्दुल सत्तार विरोधकांच्या रडारवर आहेत. टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव तसेच वाशिम येथील गायरान जमिनीवरून सत्तारांवर आरोप होत आहेत. त्यावर आता त्यांनी मौन सोडलं आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणीतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोपही सत्तार यांनी केला आहे.
“स्टाईलमध्ये सिगारेट घेऊन कुणी उभा राहिला तर तो हिरो दिसतो”; फडणवीस गुरूजींनी दिले व्यसनमुक्तीचे धडे
दरम्यान, पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्यासारख्या अल्पसंख्याक व्यक्ती कृषीमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिजे जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात आहेत. असंही सत्तार यांनी म्हटलं आहे.
“अजित पवारांनी एकतर माफी मागावी, नाहीतर…”; तुषार भोसलेंचा अजित पवारांना सज्जड दम
त्यातच अलिकडेच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी देखील असाच गौप्यस्फोट केला होता. शिंदे गटातील अनेक आमदारांच्या घोटाळ्याच्या फायली त्यांच्याच लोकं आम्हाला देत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार तुरूंगात जातील. असा इशाराही राऊतांनी दिला होता.
Read also
- चंबू देसाई म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना शंभुराज देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर
- “विनायक मेटेंची राहिलेली स्वप्न आम्ही पुर्ण करू”; फडणवीसांनी दिला मोठा आधार
- “सरकारमधील एक चंबू देसाई त्यांच्या तोडांचा चंबू झालाय”; भास्कर जाधवांची शंभूराज देसाईंवर खोचक टिका
- “नारायण राणे अन् राज ठाकरे यांची झालेली आजची भेट म्हणजे बुडत्याला काडाची आधार”
- “अभ्यासू, लढवय्या अन् सोमय्यांनाही जेरीस आणणार नेतृत्व म्हणजे..;” अंधारेंच्या परबांना कडक शुभेच्छा