नागपूर : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलतांना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टिका केली. त्यातच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. असं म्हटलं. त्यावर आता भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी अजित पवारांवर टिका केली आहे.
“2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असणार”; काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
धर्मवीर संभाजी महाराज हे आमच्या हिंदु समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहे. पण असं असतांना विरोधी पक्षनेता पद हे जनतेच्या भावना सभागृहात मांडण्यासाठी असतं. जनतेच्या भावना दुखावण्यासाठी नाही. ते जे ठासून म्हणाले की, धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. आमच्या धर्मासाठी त्यांनी बलिदान दिलंय. त्याग, समर्पण केलंय. महाराजांनी मुस्लिम, धर्माचा, अन्य धर्माचा तिरस्कार केलाय. आमची ही भूमिका नाही. परंतु आमच्या धर्माच्या स्वाभिमानासाठी आयुष्य वेचलं. आमच्या धर्माची मठ मंदिरा टिकावी, त्यांनी प्रयत्न केलेत. त्यावेळी दान पुण्य केलं. असंही तुषार भोसले म्हणाले.
“किरीट सोमय्यांचा नव वर्षातील नवे संकल्प, या ‘पाच’ नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार”
तसेच आमच्या धर्मासाठी त्यांनी 40 दिवस यातना सहन केल्या. परंतु त्यांनी कधीही धर्म सोडला नाही. अशा फालतु विचारांनी आमच्या महापुरूषांची बदनामी थांबवली पाहिजे. त्यामुळे अजित पवारांनी एकतर माफी मागावी, नाहीतर विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, असंही तुषार भोसले यांनी म्हटलं.
हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या अजित पवारांनी विरोधी पक्षनेता पदाचा राजीनामा द्यावा !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ! 🚩🚩@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra pic.twitter.com/cCmYUuEmd0
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) December 31, 2022
Read also
- “गोविंद बागेत कशासाठी अन् केव्हा गेले, हे सांगायची वेळ आणू नका”; राष्ट्रवादीचा शिंदेंना इशारा
- “आमच्यासारख्या राष्ट्रभक्तावर,, मनी लाॅंड्रिंग कायद्याचा गैरवापर,” संजय राऊतांची प्रतिक्रिया
- “5 ट्रिलियन डॉलर, बुलेट ट्रेन, 24 तास वीज, त्यासाठी फक्त 15 तास शिल्लक”; राष्ट्रवादीने मोदींना डिवचलं
- “होय, महाराष्ट्रात दोन शिवसेना, एक बाळासाहेबांची अन् दुसरी राष्ट्रवादीची शिवसेना”; शिंदे गटाच्या नेत्यांनी डिवचलं
- “तो धर्मांध क्रुरकर्मा औरंगजेबसुद्धा हसला, असेल तुमच्या विधानावर दादा” ; भाजपची टिका