मुंबई : राज्यात सध्या बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे राज्यातील राजकारण सध्या चांगलचं तापेलेलं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“प्रबोधनकारांचे विचार, अन् वर्षावर पाठीभर लिंब सापडली, कुणाला शिकवाताहेत”, शिंदेंचा टोला
राज्याचं हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील अन् शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात छोटेखानी संवाद झाला. यावेळी जंयत पाटील म्हणाले की, आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, त्यावर भास्कर जाधव यांनी मान हालवून होकार दिला. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेवर जहरी टिका करण्यास सुरूवात केली आहे.
सभागृहातच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना झाप झाप झापलं, सभागृह स्तब्ध
शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी यावरून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी यांसदर्भात एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी होय, महाराष्ट्रात दोन शिवसेना आहेत. एक बाळासाहेबांची शिवसेना अन् दुसरी एक राष्ट्रवादीची शिवसेना असं म्हणत म्हात्रे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
होय, महाराष्ट्रात दोन शिवसेना आहेत 🚩 pic.twitter.com/vb8GNkSZWT
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) December 31, 2022
Read also
- “तो धर्मांध क्रुरकर्मा औरंगजेबसुद्धा हसला, असेल तुमच्या विधानावर दादा” ; भाजपची टिका
- “2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असणार”; काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
- “किरीट सोमय्यांचा नव वर्षातील नवे संकल्प, या ‘पाच’ नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार”
- “करेक्ट कार्यक्रम करू म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांचा जोरदार टोला”
- “जर मी भाजपचा आमदार असतो तर या चौकशा लागल्या असत्या का?” राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल