नागपूर : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी यावेळी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जहरी टिका केली. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना मागचं सर्व विसरून तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडा असा सल्ला दिला. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलं.
मनसेची रणनिती ठरली, प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही रेशीमबागेत गेलो, आम्ही गोविंदबागेत गेलो नाही. सहन करण्याची मर्यादा असते. जे प्रबोधनकारांचे वारसदार आहेत. ते लिंबू फिरवण्याची भाषा करत आहेत. प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली. आम्ही वर्षावर राहायला उशीरा गेलो. आधी म्हटलं तिथे जे असेल ते बाहेर काढा. त्यावेली त्याठिकाणी पाटीभर लिंब सापडली. कोणाला बोलताय? असं म्हणत शिंदेंनी सेनेला धारेवर धरलं.
अधिवेशनानं महाराष्ट्राला नेमकं दिलं काय? ठाकरे गटाच्या आमदाराची खंत
तसेच ज्यांना तुमची अंडी पिल्ली माहितीयेत. हिंमत असेल तर मैदानात लढा असं म्हणत आहेत. जे घरातून बाहेरच पडत नाहीत. ते हिमंतीची भाषा करतात हा मोठा विनोद आहे. बाळासाहेब पाठीशी उभे राहायचे. तुम लढो, हम कपडे संभालते हे, अशआ स्वभावाचे ते नव्हते. असा टोलाही शिंदेंनी लगावला. तसेच हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा अन् एक लाख मिळावा, असं बक्षिस लावलं. असा टोमणा मारला. अन् मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला. तसेच लोकांचं बक्षिस वाचावं म्हणून आम्ही थेट मुख्यमंत्रीच बदलला. तसेच लोकांना मोठं बक्षिस देऊन टाकलं. अन् त्यामुळे न्याय विदर्भाला मिळाला. असंही शिंदे यावेळी सभागृहात म्हणाले.
“दादा संधी असतांनाही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही,” फडणवीसांनी दु:खावर मीठ चोळले
दरम्यान, सभागृहात याआधी अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेत, त्यांच्यावर विरोधक कडाडून टिका करीत होते. परंतु सभागृहात त्यांनी हा विषय काढला नाही. मग राज्याचे इतर महत्वाचे विषय असतांना तुम्ही बिकेसीवरील भाषणांतील अनेक मुद्दे येथे मांडलेत. तुमचे बाहेर कितीही वाईट संबंध असतील ते तुम्ही बाहेर मांडा. सभागृहात महाराष्ट्र्च्या हिताचे प्रश्न मांडा. असं म्हणत अजित पवारांनी शिंदेंना खडसावलं.
Read also
- सभागृहातच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना झाप झाप झापलं, सभागृह स्तब्ध
- “कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचा पाणी पळवतोय, तुम्ही काय करता?” अजित पवारांचा सवाल
- “अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा”; शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
- “ईडी,सीबीआयचा विषय निघाताच यामिनी जाधव आक्रमक, भास्कर जाधवांची माघार”, सभागृह शांत
- तब्बल ४० वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडच्या भूमिपूत्रांना न्याय ! प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा प्रश्न अखेर सुटला