नागपूर : विधानसभेच्या कालच्या अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवारांनी टोलेबाजी करत सभागृहात एकच हश्शा पिकवला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन, देशभरातून भावपुर्ण श्रंद्धाजली
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं भाषण मी ऐकलं. त्यांना अनेक वर्षापासून मी ओळखतो, तसेच त्यांचं भाषण रोखठोक असतं. यातच जे काही भाषण झालं ते 100 टक्के भाषण हे अजित पवार यांचं वाटतं नसतं. तर त्यामध्ये 50 टक्के भाषण हे जयंत पाटलांचं वाटत होतं. त्यामुळे जंयत पाटील सभागृहात नसल्याने अर्धा भाषणं त्यांनी लिहून दिलं. असा भास या भाषणातून दिसून आला. असा टोला हाणला.
भारतातील पहिल्या संविधान भवनच्या कामाला गती द्या : आमदार महेश लांडगे
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, दादा तुम्हाला वीज तोडण्याचा जीआर कसा सापडला नाही. तो मी ट्विट देखील केला होता. त्यामुळे तुम्ही मला ट्विटरवर फॉलो करा, असा सल्लाही अजित पवारांना फडणवीसांनी दिला. तसेच मला एका गोष्टीचं दुख आहे की, संधी असताना देखील पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. 2004 ला संधी होती. तुमचे जास्त लोकं निवडून आले होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री होता. परंतु ती संधी तुम्हाला काही मिळाली नाही. असा शाब्दिक टोलाही त्यांनी हाणला.
Read also
- “शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बाॅम्ब”, बावनकुळेंनी डिवचलं
- “याबद्दल मला कुठली माहिती नाही”, अजित पवारांची नाराजी, महाविकास आघाडीत फुट
- “राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, काळी टोपी उडवत मविआचं आंदोलन”
- “अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी..;” संजय राऊतांनी व्यक्त केलं दु:ख
- “शिंदे अन् फडणवीस साहेबांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी”