नागपूर : विदर्भासाठी आमच्या सरकारने धानाला मागणी नसताना आम्ही बोनस दिला. आम्हाला माहिती नसतांनाही शेतकऱ्यांना काय पाहिजे हे देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी जसा गाडीत फिरतो, तसा विदर्भातील शेतकरी देखील गाडीतून फिरला पाहिजे. त्यासाठी आम्ही समृद्धी महामार्ग केला आहे. त्यामुळे आता तो चांगल्या गाडीतून फिरायला लागला आहे. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टरमधून फिरलं पाहिजे. त्यासाठी आम्ही तालुका पातळीवर हेलिपॅड बनवतोय. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
“शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणणं म्हणजे फुसका बाॅम्ब”, बावनकुळेंनी डिवचलं
मुख्यमंत्री कसा शेतात जातो, म्हणून मला हिणवन्यात आलं. हेलिकॉप्टरमधून शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा अन् एक लाख मिळावा, असं बक्षिस लावलं. असा टोमणा मारला. अन् मी म्हणतो अडीच वर्ष बाहेर पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा, असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला. तसेच लोकांचं बक्षिस वाचावं म्हणून आम्ही थेट मुख्यमंत्रीच बदलला. तसेच लोकांना मोठं बक्षिस देऊन टाकलं. अन् त्यामुळे न्याय विदर्भाला मिळाला. असंही शिंदे म्हणाले.
“याबद्दल मला कुठली माहिती नाही”, अजित पवारांची नाराजी, महाविकास आघाडीत फुट
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागेच शिंदेंवर टिका केली होती. एकनाथ शिंदे हे ज्यावेळी आपल्या शेतात गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कडाडून टिका केली होती. त्यावेळी महाराष्ट्रातला शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा अन् लाखो रूपये बक्षिस मिळवा, असं म्हटलं होतं. त्यावर आज शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Read also
- “ईडी,सीबीआयचा विषय निघाताच यामिनी जाधव आक्रमक, भास्कर जाधवांची माघार”, सभागृह शांत
- तब्बल ४० वर्षांनंतर पिंपरी-चिंचवडच्या भूमिपूत्रांना न्याय ! प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा प्रश्न अखेर सुटला
- मनसेची रणनिती ठरली, प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल
- अधिवेशनानं महाराष्ट्राला नेमकं दिलं काय? ठाकरे गटाच्या आमदाराची खंत
- “दादा संधी असतांनाही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही,” फडणवीसांनी दु:खावर मीठ चोळले