नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन बारामती लक्ष्य केले आहे. त्यासाठी अलिकडेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौरा केला. त्या दौऱ्याच्या वेळी त्यांनी पुढच्या वर्षी राष्ट्रवादीचं घड्याळ आम्ही बंद पाडू, तसेच करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा बावनकुळे यांनी दिला होता. त्याचे पडसाद काल विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील बघायला मिळाले.
“ईडी,सीबीआयचा विषय निघाताच यामिनी जाधव आक्रमक, भास्कर जाधवांची माघार”, सभागृह शांत
राज्यात भाजप-शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर काही नेते बारामतीत आले. तसेच बारामतीत येऊन घड्याळ बंद करत करेक्ट कार्यक्रम करणार असल्याच्या वल्गना करू लागले. आता आमचं तिथे काम आहे, खरचं करेक्ट कार्यक्रम होणार का? असा सवाल कर जर मनात घेतलं तर, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन. महाराष्ट्राला माहिती आहे की, मी एकदा मनावर घेतलं तर माझं मी स्वत:चंही ऐकत नाही. असं म्हणत अजित पवारांनी बावनकुळेंची विधानसभेत फिरकी घेतली. त्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काल हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, बारामतीत येऊन कोणी आव्हान देणं अजित पवारांना आवडत नाही. राजकारणात कोणी आढळपद घेऊन आलं नाही. इंदिरा गांधी यांच्यासारख्या अतिशय शक्तीशाली नेत्याला देखील निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. असा इशारा फडणवीसांनी अजित पवारांना दिला.
मनसेची रणनिती ठरली, प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभा, वक्त्यांची यादीही फायनल
दरम्यान, तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, 2014 साली सुप्रिया सुळे थोड्या मतांनी निवडून आल्या आहेत. बारामती मतदारसंघावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं लक्ष आहे. मिशन बारामती प्रमाणे मिशन महाराष्ट्र आहे. मिशन महाराष्ट्र अंतर्गत बावनकुळे बारामतीत गेल्याने बावनकुळेंचा अजित पवारांना फार राग आलेला दिसत आहे. अजित पवारांना समजून सांगू, की महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही जात आहे. असा सल्लाही त्यांनी दिला.
Read also
- “जर मी भाजपचा आमदार असतो तर या चौकशा लागल्या असत्या का?” राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल
- “प्रबोधनकारांचे विचार, अन् वर्षावर पाठीभर लिंब सापडली, कुणाला शिकवाताहेत”, शिंदेंचा टोला
- सभागृहातच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना झाप झाप झापलं, सभागृह स्तब्ध
- “कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचा पाणी पळवतोय, तुम्ही काय करता?” अजित पवारांचा सवाल
- “अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा”; शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं