नवी दिल्ली : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांनी केली आहे. त्यामुळे आता यावर देशातील विरोधी पक्ष काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राचा पाणी पळवतोय, तुम्ही काय करता?” अजित पवारांचा सवाल
कमलनाथ यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी हे केवल सत्तेची नाही, तर जनतेचे कारण करतात. अशा नेत्याला देशातील जनता सिंहासनावर बसवतात. जगाच्या इतिहासात 3500 किलोमीटरहुन अधिक पदयात्रा कोणत्याही व्यक्तीने केलेली नाही. भारत देशासाठी गांधी कुटूंबाने जेवढा त्याग, बलिदान केले आहे, तेवढा अन्य कोणत्याही कुटूंबाने केलेला नाही, अस देखील कमलनाथ यांनी सांगितले आहे.
“अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, अन् बक्षिस मिळवा”; शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
पुढे बोलताना त्यांनी असं म्हटलं की, जेव्हा राहुल गांधी भारत जोडो यात्रा दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांतून जात होती, तेव्हा भाजपने महाराष्ट्रात ही यात्रा अयशस्वी होईल असा प्रचार केला. मात्र, या यात्रेला महाराष्ट्रात अधिक पाठिंबा मिळाला. त्यानंतर उत्तरेत ही या यात्रेला दक्षिण भारतासारखा पाठिंबा मिळणार नाही, असे सांगण्यात आले. पण मध्य प्रदेशात आल्यानंतर तर या यात्रेने सर्व विक्रम मोडीत काढले. असंही त्यांनी आवर्जून म्हटले.
“ईडी,सीबीआयचा विषय निघाताच यामिनी जाधव आक्रमक, भास्कर जाधवांची माघार”, सभागृह शांत
दरम्यान, सध्या देशात मोदी लाट वेगात सुरू आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांची अशी प्रतिमा तयार करून ठेवली आहे की, पुढच्या निवडणुकीत देखील मोदी पंतप्रधान म्हणून सहज निवडणून येतील. परंतु देशातील विरोधक एकजुट झाले तर भाजपही लोकसभेची निवडणुक जिंकणे अवघड ठरू शकते. परंतु विरोधकांमध्ये पंतप्रधानांचा चेहरा कोण असणार. त्याचा मोठा गोंधळ आहे.
Read also
- “किरीट सोमय्यांचा नव वर्षातील नवे संकल्प, या ‘पाच’ नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार”
- “करेक्ट कार्यक्रम करू म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांचा जोरदार टोला”
- “जर मी भाजपचा आमदार असतो तर या चौकशा लागल्या असत्या का?” राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल
- “प्रबोधनकारांचे विचार, अन् वर्षावर पाठीभर लिंब सापडली, कुणाला शिकवाताहेत”, शिंदेंचा टोला
- सभागृहातच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना झाप झाप झापलं, सभागृह स्तब्ध