मुंबई : यंदाचं वर्ष अनेक घटनांमुळे चर्चेत आलं आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी असंख्य लोकं घराबाहेर पडली आहे. यातच या वर्षात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी देखील घडल्या आहेत. यावर्षी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या. परंतु त्या तशाच राहिल्या आहेत. यावरून राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचलं आहे.
“जर मी भाजपचा आमदार असतो तर या चौकशा लागल्या असत्या का?” राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल
पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात भारतातील प्रत्येक भारतीयाकडे 2022 पर्यंत घरं असणार असल्याची घोषणा केली होती. परंतु ती घोषणा तशीच राहिली आहे. त्याचबरोबर 2022 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचेल. 2022 पर्यंत भारतातील प्रत्येक घरात 24 तास वीज असेल. 2022 पर्यंत बुलेट ट्रेन असेल. अशा घोषणा केल्या होत्या. त्यावरून आता राष्ट्रवादीने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“प्रबोधनकारांचे विचार, अन् वर्षावर पाठीभर लिंब सापडली, कुणाला शिकवाताहेत”, शिंदेंचा टोला
या घोषणांच्या संदर्भात राष्ट्रवादीने ट्विट करत, यावरून आता 2023 साठी 15 तास शिल्लक राहिले आहेत. असं म्हणत राष्ट्रवादीने मोदींवर टिका केली आहे. मध्यंतरी नरेंद्र मोदी यांची अच्छे दिन ची घोषणा देखील मोठ्या प्रमाणात गाजली होती. त्यावरूनही विरोधकांनी मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
Read also
- “होय, महाराष्ट्रात दोन शिवसेना, एक बाळासाहेबांची अन् दुसरी राष्ट्रवादीची शिवसेना”; शिंदे गटाच्या नेत्यांनी डिवचलं
- “तो धर्मांध क्रुरकर्मा औरंगजेबसुद्धा हसला, असेल तुमच्या विधानावर दादा” ; भाजपची टिका
- “2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असणार”; काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
- “किरीट सोमय्यांचा नव वर्षातील नवे संकल्प, या ‘पाच’ नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार”
- “करेक्ट कार्यक्रम करू म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांचा जोरदार टोला”