मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालायला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी डॉ. हेगडेवार यांना अभिवादन केलं. त्यावरून शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर खोचक टिप्पणी केली. त्यानंतर लगचेच शिंदेंनी देखील त्यावर प्रत्युत्तर दिलं.
“किरीट सोमय्यांचा नव वर्षातील नवे संकल्प, या ‘पाच’ नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार”
ठाकरेंनी शिंदेंवर टोला हाणतांना म्हटलं की, रेशीम बागेत मंतरलेली लिंब वैगेरे टाकली आहेत का? उद्या हे संघाच्या कार्यालयावरही दावा करतील. असा टोला हाणला. त्यावर बाळासाहेबांचे विचार आमच्या डोक्यात आहेत. आमच्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे कामच आम्ही करतो, म्हणूनच आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंद बागेत गेलो नाही. असं शिंदेंनी म्हटलं.
“करेक्ट कार्यक्रम करू म्हणणाऱ्या अजित पवारांना फडणवीसांचा जोरदार टोला”
त्यावर आता राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबुब शेख यांनी शिंदेंवर टिका केली आहे. गोविंद बागेत तुम्ही खुप वेळा जाऊन आलाय, किती वेळा जाऊन आलाय अन् कुठे जाऊन आलाय, कसं जाऊन आलाय, अन् कशासाठी जाऊन आलाय हे सांगायची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“जर मी भाजपचा आमदार असतो तर या चौकशा लागल्या असत्या का?” राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल
दरम्यान, शिंदे पुढे म्हणाले होते की, सहन करण्याची एक मर्यादा असते. जे प्रबोधनकारांचे वारसदार आहेत. ते लिंबू फिरवण्याची भाषा करत आहेत. प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली. आम्ही वर्षावर राहायला उशीरा गेलो. आधी म्हटलं तिथे जे असेल ते बाहेर काढा. त्यावेली त्याठिकाणी पाटीभर लिंब सापडली. कोणाला बोलताय? असं म्हणत शिंदेंनी सेनेला धारेवर धरलं.
गोविंद बागेत तुम्ही खूप वेळा जाऊन आलाय , किती वेळा जाऊन आलाय आन कुठे जाऊन आलाय, कस जाऊन आलाय आन कशासाठी जाऊन आलाय हे सांगायची वेळ आणू नका…
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) December 30, 2022
Read also
- “आमच्यासारख्या राष्ट्रभक्तावर,, मनी लाॅंड्रिंग कायद्याचा गैरवापर,” संजय राऊतांची प्रतिक्रिया
- “5 ट्रिलियन डॉलर, बुलेट ट्रेन, 24 तास वीज, त्यासाठी फक्त 15 तास शिल्लक”; राष्ट्रवादीने मोदींना डिवचलं
- “होय, महाराष्ट्रात दोन शिवसेना, एक बाळासाहेबांची अन् दुसरी राष्ट्रवादीची शिवसेना”; शिंदे गटाच्या नेत्यांनी डिवचलं
- “तो धर्मांध क्रुरकर्मा औरंगजेबसुद्धा हसला, असेल तुमच्या विधानावर दादा” ; भाजपची टिका
- “2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असणार”; काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा