मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरून आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्यावरून खोचक टोला हाणला आहे.
“आमच्यासारख्या राष्ट्रभक्तावर,, मनी लाॅंड्रिंग कायद्याचा गैरवापर,” संजय राऊतांची प्रतिक्रिया
नारायण राणे आणि राज ठाकरे यांची झालेली आजची भेट म्हणजे. बुडत्याला काडाची आधार असा टोला सुरज चव्हाण यांनी नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्याभेटीवर लगावला. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नीलम राणे सुद्धा उपस्थित आहेत. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आजच्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चेत झाली हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. भाजपने आपलं सर्व लक्ष आता मुंबईसह महापालिकेवर केंद्रीत केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. सोबतच मनसे देखील युतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला सुरूवात झाली आहे.
Read also
- “अभ्यासू, लढवय्या अन् सोमय्यांनाही जेरीस आणणार नेतृत्व म्हणजे..;” अंधारेंच्या परबांना कडक शुभेच्छा
- धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये”, बावनकुळेंचा एका वाक्यात पवारांचा समाचार
- “स्टाईलमध्ये सिगारेट घेऊन कुणी उभा राहिला तर तो हिरो दिसतो”; फडणवीस गुरूजींनी दिले व्यसनमुक्तीचे धडे
- “अजित पवारांनी एकतर माफी मागावी, नाहीतर…”; तुषार भोसलेंचा अजित पवारांना सज्जड दम
- “गोविंद बागेत कशासाठी अन् केव्हा गेले, हे सांगायची वेळ आणू नका”; राष्ट्रवादीचा शिंदेंना इशारा