बीड : स्व. विनायक मेटे यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजाची सेवा केली. 24 तास सामाजिक कार्य त्यांच्या मनात राहायचं. ते कायमच समाजासाठी उपक्रम करत असायचे. यामध्ये मराठा आरक्षण असो किंवा शिवरायांच्या स्मारकाचा विषय असो हे त्यांच्या मनातले विषय होते. विनायक मेटे यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या मागे उभे राहू असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योती मेटे यांना मदतीच आश्वासनही दिलं आहे. व्यसनमुक्त बीड अभियानांतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
“अजित पवारांनी एकतर माफी मागावी, नाहीतर…”; तुषार भोसलेंचा अजित पवारांना सज्जड दम
स्व. मेटे यांच्या पश्चात श्रीमती ज्योतीताई मेटे यांनी हे अभियान पुढे नेण्याचा विडा उचलला. मोठ्या प्रमाणात तरुणाईला व्यसनाधीन केले. व्यसनाधीन तरुणाई ही दुश्मनाचा मुकाबला कसा करेल ? हा केवळ व्यसनाचा विषय नाही. हा छुप्या युद्धाचा भाग देखील आहे, जिथे आमच्या तरुणाईला सुखासीनतेकडे, व्यसनाधीनतेकडे न्यायचे. त्यांच्या मनातली श्रद्धा कमी करायची. त्यांची दृढता संपुष्टात आणायची अशा प्रकारचे षडयंत्र आहे. याच्या विरोधात आपल्याला लढावेच लागेल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
“गोविंद बागेत कशासाठी अन् केव्हा गेले, हे सांगायची वेळ आणू नका”; राष्ट्रवादीचा शिंदेंना इशारा
दरम्यान, या व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून माझ्या पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना, बालकांना, तरुणांना मी विनंती करणार आहे. आज जी शपथ आपण घेत आहोत ती तुम्ही अंमलात आणा. कदाचित आधीच्या पिढीतील व्यसनाधीनता तुम्ही पाहिली असेल. ती तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका, ही विनंती तुम्हाला करतो.
“आमच्यासारख्या राष्ट्रभक्तावर,, मनी लाॅंड्रिंग कायद्याचा गैरवापर,” संजय राऊतांची प्रतिक्रिया
आपल्या सरकारने अंमली पदार्थांच्या विरोधात खूप मोठी मोहिम सुरु केली आहे. 4000 कोटी रुपयांची अंमली पदार्थ जप्त करून आपण जाळून टाकली. व्यसनमुक्तीचे जे कार्य विनायक मेटे यांनी हाती घेतले होते, ते कार्य ज्योतीताई पुढे नेत आहेत. आपण सगळे मिळून या कार्याला व्यापकता कशी येईल, केवळ बीडमध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रात असे कार्यक्रम कसे होतील हा प्रयत्न येत्या काळात आपण निश्चित करू. असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Read also
- “सरकारमधील एक चंबू देसाई त्यांच्या तोडांचा चंबू झालाय”; भास्कर जाधवांची शंभूराज देसाईंवर खोचक टिका
- “नारायण राणे अन् राज ठाकरे यांची झालेली आजची भेट म्हणजे बुडत्याला काडाची आधार”
- “अभ्यासू, लढवय्या अन् सोमय्यांनाही जेरीस आणणार नेतृत्व म्हणजे..;” अंधारेंच्या परबांना कडक शुभेच्छा
- धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये”, बावनकुळेंचा एका वाक्यात पवारांचा समाचार
- “स्टाईलमध्ये सिगारेट घेऊन कुणी उभा राहिला तर तो हिरो दिसतो”; फडणवीस गुरूजींनी दिले व्यसनमुक्तीचे धडे